Advertisement

बुरखा बंदीवरून मुंबईतील चेंबूरच्या आचार्य कॉलेजमध्ये तणाव, नेमकं काय घडलं?

कॉलेज प्रशासन बुरखा घालून येणाऱ्या विद्यार्थ्यांना परवानगी देणार नाही यावर ठाम असल्याची माहिती आहे.

बुरखा बंदीवरून मुंबईतील चेंबूरच्या आचार्य कॉलेजमध्ये तणाव, नेमकं काय घडलं?
SHARES

मुंबईतील (Mumbai News) चेंबूर (Chembur) भागात आचार्य महाविद्यालयात गणवेश सक्ती आणि बुरखा बंदी ( Hijab Ban) करण्यात आली आहे. त्यानंतर महाविद्यालयात बुरखा परिधान करुन येणाऱ्या विद्यार्थीनींना प्रवेश करण्यास मज्जाव केला. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. कॉलेज प्रशासन बुरखा घालून येणाऱ्या विद्यार्थ्यांना परवानगी देणार नाही यावर ठाम असल्याची माहिती आहे.

चेंबूरच्या एन. जी. आचार्य आणि डी. के. मराठे कॉलेजमध्ये गणवेशवर बुरखा घालून कॉलेजमध्ये प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला. महाविद्यालय प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयावर मुस्लिम आणि इतर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली.

महाविद्यालयात प्रवेश केल्यानंतर बुरखा काढू अशी भूमिका विद्यार्थीनींनी घेतली. महाविद्यालयाच्या गणवेश परिधान करण्याबाबत काहीच हरकत नाही. मात्र, कॉलेजच्या आतमध्ये बुरखा काढण्यास जागा उपलब्ध करुन द्यावी तिथे बुरखा काढून विद्यार्थिनी येतील अशी भूमिका यावेळी विद्यार्थीनींनी मांडली. मात्र, महाविद्यालय प्रशासनाने आपली भूमिका ठाम ठेवली. त्याच्या परिणामी काही वेळ महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली. 

आचार्य आणि डी. के. मराठे महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थिनी कॉलेजमध्ये आत आल्यानंतर अनेक वर्षापासून आणि नवीन विद्यार्थीनीदेखील आपला बुरखा बदलून कॉलेजचा युनिफॉर्म परिधान करतात.

या प्रकाराची माहिती मिळताच, तातडीने पोलीस महाविद्यालयाच्या ठिकाणी दाखल झाले. पोलिसांनी महाविद्यालयाच्या प्राचार्या, इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू  केली आहे. हेही वाचा

जयपूर-मुंबई ट्रेन गोळीबार: RPF कॉन्स्टेबलला एका प्रवाशाला हॉस्टेज ठेवायचे होते का? तपास चालू

सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाची पोलिसात तक्रार, अनधिकृत अॅपबाबत भाविकांना इशारा

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा