Advertisement

'वन रुपी'चं महिलांना गिफ्ट, २०० रुपयांत वैद्यकीय तपासणी सुविधा


'वन रुपी'चं महिलांना गिफ्ट, २०० रुपयांत वैद्यकीय तपासणी सुविधा
SHARES

जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी महिलांना सर्व प्रकारची वैद्यकीय तपासणी सुविधा केवळ २०० रुपयांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मुंबईतील १२ रेल्वे स्थानकात ही सुविधा उपलब्ध असणार आहे. या संधीचा महिलांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असं आवाहन 'वन रुपी क्लिनिक'चे प्रमुख डॉ. राहुल घुले यांनी केलं आहे.


कुठल्या तपासण्यांचा समावेश?

कुटुंबासाठी झटत असताना बऱ्याच महिला स्वत: च्या प्रकृतीकडे अनेकदा दुर्लक्ष करतात. त्याचे त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतात. यासाठीच महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने तपासणी करण्यासाठी 'वन रुपी क्लिनिक'ने पुढाकार घेत सर्व तपासण्या २०० रुपयांत करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यात ब्लडप्रेशर, ब्लडशुगर, थायरॉईड, सीबीसी, उंची, वजन, रक्त तपासणी, अशा चाचण्यांचा समावेश असणार आहे.


'या' स्थानकांत शिबीर

मुंबईतील विविध १२ रेल्वे स्थानकावरील वनरूपी क्लिनिकमध्ये महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. दादर, वडाळा, कुर्ला, सायन, भायखळा, घाटकोपर, मुंब्रा, मुलुंड, ठाणे, गोवंडी, मानखूर्द, वाशी आणि टिटवाळा यांसारख्या स्थानकात दिवसभर तपासणी शिबीर सुरु असणार आहे. 'वन रुपी क्लिनिक' न सापडल्यास महिलांसाठी ०८०३०६३६१६६ हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर फोन केल्यास ऑपरेटर निश्चित पत्ता सांगतील.


ज्या महिला रोज ट्रेनने प्रवास करतात अशा महिलांना या सुविधेचा उपयोग होईल. मुंबईतील १२ रेल्वे स्थानकांवर हे शिबीर राबवण्यात येईल. जिथे २०० रुपयांत सर्व चाचण्या करुन मिळतील. शिवाय, रिपोर्ट्स ही तात्काळ दिले जातील. खासगी लॅबोरटरीजमध्ये थायरॉईडची चाचणी केल्यास एका वेळेस ५०० रुपये घेतले जातात. पण, वन रुपी क्लिनिक ही चाचणी २०० रुपयांत करुन देणार आहे. त्यामुळे या सुविधेचा महिलांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. जेणेकरुन चाचणीत काही आढळून आलं, तर त्यांच्यावर त्वरीत उपचार करणंही सोपं जाईल.
- डॉ. राहुल घुले, प्रमुख, वनरूपी क्लिनिक

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा