आदिवासी पाड्यातील बांधवांना वस्त्रदान

 Sham Nagar
आदिवासी पाड्यातील बांधवांना वस्त्रदान
आदिवासी पाड्यातील बांधवांना वस्त्रदान
आदिवासी पाड्यातील बांधवांना वस्त्रदान
आदिवासी पाड्यातील बांधवांना वस्त्रदान
आदिवासी पाड्यातील बांधवांना वस्त्रदान
See all

जोगेश्वरी - महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचं संवर्धन करताना गडावर वास्तव्य करणाऱ्यांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशातून एकत्रित आलेल्या काही तरुणांनी वस्त्रदान उपक्रम राबवलाय. या उपक्रमाद्वारे मांडवी ते वज्रेश्वरी दरम्यान सोमवारी आदिवासी पाड्यांना भेटी देऊन वस्त्रदान केलं. यामध्ये जयभीमनगर, तबेलपाडा आणि काजूपाडा या आदिवासी पाड्यातील 100 कुटुंबाना वस्त्रदान करून मदतीचा हात दिलाय. यामध्ये 40 तरुणांनी सहभाग घेतला होता. तरुणाच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या जोगेश्वरी भटकंती कट्टा या संस्थेच्या वतीने या उपक्रमासाठी जुने कपडे देण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.

Loading Comments