Advertisement

विद्यार्थी परिषदेवर युवासेनेचा पहिला झेंडा...


विद्यार्थी परिषदेवर युवासेनेचा पहिला झेंडा...
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेतील पहिल्या टप्प्यात युवासेनेनं बाजी मारली आहे. यामध्ये अभाविप उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने युवासेनेच्या ओंकार भोपीची मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या सचिवपदी बिनविरोध निवड झाली आहे. याची औपचारिक घोषणा ७ फेब्रुवारीला विद्यार्थी कल्याण विभागातर्फे करण्यात येणार असल्याचं मुंबई विद्यापीठाने सांगितलं आहे.



'तो' अर्ज बादच

विद्यापीठ कायद्यानुसार विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका येत्या महिन्याभरात होणार असून सध्या त्यावरून संघटनांमध्ये वाद सुरू आहेत. अभाविपने निवडणुका घ्याव्यात असं पत्र दिल्याने सचिवपदाची निवडणूक रोखता आली नाही. शुक्रवारी विद्यार्थी परिषदेतील निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती. यामुळे सर्वच संघटनांची लगबग सुरू झाली. यात अभाविपच्या पाठिंब्याने पूनम शिंदेनं अर्ज सादर केला. पण तिच्या अर्जावर जन्मतारीखच नसल्यानं छाननीदरम्यान तो रद्द करण्यात आला आणि दुसरा कोणीही स्पर्धक नसल्यामुळे भोपीची बिनविरोध निवड करण्यात आली.


फौजदारी दाखल करण्याची मागणी

अभाविपने या निवडणुकीसाठी खालच्या थराला जाऊन उमेदवाराच्या अर्जावर सूचक आणि अनुमोदक यांच्या बोगस सह्या घेतल्याची तक्रार युवासेनेकडून करण्यात आली होती. यामुळे या प्रकरणातील दोषी उमेदवार आणि 'अभाविप'वर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी युवासेनेतर्फे करण्यात आली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा