Advertisement

‘द कश्मीर फाइल्स’ लवकरच ओटीटीद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला

बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे.

‘द कश्मीर फाइल्स’ लवकरच ओटीटीद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला
SHARES

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींच्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे.

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट लवकरच ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. विवेक अग्निहोत्री यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर याबाबतची माहिती दिली आहे.


‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर येत्या १३ मे रोजी प्रदर्शित होईल. त्यामुळे ज्यांना चित्रपटगृहात हा चित्रपट पाहता आला नाही. त्यांना घरी बसून हा चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे.

गेल्या ११ मार्चला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं भारतात २५० कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली होती. तर जगभरात या चित्रपटानं ३४० रुपयांचा गल्ला जमवला होता. ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचा बजेट हा १२ कोटी रुपये होता. या चित्रपटानं बजेटच्या २८ पट कमाई केली आहे.

चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

दरम्यान विवेक अग्निहोत्रींनी आता आगामी चित्रपट ‘दिल्ली फाइल्स’ वर काम करायला सुरुवात केली आहे. ‘द दिल्ली फाइल्स’ हा चित्रपट दिल्लीतील गुन्ह्यांच्या सत्य घटनांवर आधारित असणार आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा