Advertisement

‘संगीत सम्राट’ मध्ये रंगणार सुरांचा महासंगम


‘संगीत सम्राट’ मध्ये रंगणार सुरांचा महासंगम
SHARES

नवीन टॅलेंटला वाव देणाऱ्या संगीत सम्राट या शोचं २ रं पर्व नुकतंच झी युवा वाहिनीवर सुरू झालं आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील होतकरू गायक आणि संगीतकारांना त्यांची कला सादर करण्याची संधी मिळत आहे.

या नव्या पर्वात नादमधुर सह्याद्री, स्वरमय कोकण, सूरसाज विदर्भ आणि लयदार मराठवाडा या टीम्सच्या माध्यमातून स्पर्धक भाग घेत आहेत. सावनी रवींद्र, जुईली जोगळेकर, राहुल सक्सेना आणि अभिजीत कोसंबी या टीम्सचे कॅप्टन्स आहेत.


टीममध्ये ७ स्पर्धक

सर्व कॅप्टन्सनी त्यांच्या टीममध्ये ७ स्पर्धकांची निवड केल्यानंतर आता वेळ आली आहे ती म्हणजे खऱ्या कसोटीची. या आठवड्यात चारही टीम्समध्ये सुरांचा महासंगम रंगणार आहे. टीम राहुल विरुद्ध टीम सावनी आणि टीम अभिजीत विरुद्ध टीम जुईली असा सुरांचा सामना होईल. प्रत्येक टीममधील स्पर्धक आपल्या विरुद्ध स्पर्धकासोबत असलेली जुगलबंदी जिंकला, तर त्या टीमच्या गुणांमध्ये वाढ होईल. या आठवड्यात हरगुन एक लावणी गाणार आहे. तसंच नेहमीच परीक्षकांची दाद मिळवणार ४ एम बँडदेखील त्यांच्या परफॉर्मन्सने चकीत करणार आहे.



हेही वाचा -

बिग बॉसमध्ये ‘बॉक्स-अनबॉक्स’चं कार्य

‘सविता दामोदर परांजपे’ आणि ‘Once मोअर’मधील वाद टळला




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा