'सुखाच्या सरीं'चं त्रिशतक!

काही मालिका प्रेक्षकांना इतक्या भावतात की त्या वर्षानुवर्षे मनोरंजन करण्यात यशस्वी होतात. सुरुवातीपासूनच छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेल्या 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकेनं त्रिशतक म्हणजेच ३०० भागांचा टप्पा गाठला आहे.

  • 'सुखाच्या सरीं'चं त्रिशतक!
  • 'सुखाच्या सरीं'चं त्रिशतक!
SHARE

काही मालिका प्रेक्षकांना इतक्या भावतात की त्या वर्षानुवर्षे मनोरंजन करण्यात यशस्वी होतात. सुरुवातीपासूनच छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेल्या 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकेनं त्रिशतक म्हणजेच ३०० भागांचा टप्पा गाठला आहे.


नवा अध्याय 

'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकेमधील अनु आणि सिध्दार्थची जोडी बघता बघता संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी जोडी बनली. या दोघांच्या सुख–दु:खात, त्यांच्या अडचणीमध्ये प्रेक्षकांनी त्यांची साथ दिली. अनु आणि सिध्दार्थसोबत ते हसले, रडले त्यांना भरपूर आशिर्वाद दिले. प्रेक्षक या दोघांचं लग्न कधी होईल? याची वाट आतुरतेनं बघत होते आणि अखेरीस तो क्षण आला, अनु-सिद्धार्थचा विवाह सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. या दोघांच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू झाला. या सगळ्यामध्ये आता मालिकेनं ३०० भागांचा टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. आजवर प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळेच हे होऊ शकले यात शंका नसल्याचं मालिकेच्या टीमचं मत आहे.


केक कापून सेलिब्रेशन

मालिकेतील सगळ्या कलाकारांसह संपूर्ण यूनिटनं हा क्षण खूप उत्साहात आणि आनंदात साजरा केला. केक कापून संपूर्ण टीमनं त्रिशतक पूर्ण केल्याचा आनंद सेलिब्रेट केला. याप्रसंगी सर्वांनी सेल्फी काढत सेटवरील आनंदाचे क्षण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवले. भविष्यातही ही मालिका अशीच वाटचाल करेल आणि रसिकांचं मनोरंजन करत त्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करेल अशी आशा मालिकेच्या टीमच्या वतीनं व्यक्त करण्यात आली आहे. या मालिकेत लवकरच काही नाट्यमय घडामोडी घडणार असून, त्या रसिकांची उत्सुकता वाढवणार आहेत.हेही वाचा  -

राशीचं भविष्य मांडणार 'आलंय माझ्या राशीला'

सायली-शिवानी बनल्या सलमानच्या नायिका!
संबंधित विषय
ताज्या बातम्या