Advertisement

२०२० मधील १०० कोटींच्या घरात मजल मारणारे ५ चित्रपट

२०२० या सालात १०० कोटींहून अधिकचा गल्ला या ५ चित्रपटांनी जमवला.

SHARES
01/5
२०२० मधील १०० कोटींच्या घरात मजल मारणारे ५ चित्रपट
तानाजी तानाजी हा चित्रपट मराठा साम्राज्यातील सरसेनापती सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या चरित्रावर आधारित आहे. या चित्रपटात अजय देवगण याने मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच काजोल, शरद केळकर, सैफ अली खान हे कलाकार अन्य भूमिका साकारताना दिसतात. चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केलं आहे. ३५१ कोटींची कमाई या चित्रपटानं केली आहे.
02/5
२०२० मधील १०० कोटींच्या घरात मजल मारणारे ५ चित्रपट
वैकुंठापुरमुलु २०२० मध्ये आलेला हा तेलगु चित्रपट आहे. त्रिविक्रम श्रीनिवास यांनी दिग्दर्शन केला आहे. तर अल्लू अरविंद आणि एस. राधा कृष्णा यांनी त्यांच्या बॅनर अंतर्गत गीता आर्ट्स आणि हारिका आणि हॅसिन क्रिएशन्सद्वारे हा चित्रपट तयार केला. चित्रपटात अल्लू अर्जुन आणि पूजा हेगडे आहेत. तर तब्बू, जयराम, सुशांत, नवदीप, निवेठा पेठुराज, समुद्रिकाणी, मुरली शर्मा, राजेंद्र प्रसाद, सुनील, सचिन खेडेकर आणि हर्षवर्धन यांच्याही मुख्य भूमिका आहे. या चित्रपटानं २८० कोटींची कमाई केली आहे.
03/5
२०२० मधील १०० कोटींच्या घरात मजल मारणारे ५ चित्रपट
सरीलेरू नीकेववारू ११ जानेवारी २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा तेलगु चित्रपट आहे. अनिल रविपुडी यांनी याचे दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात महेश बाबू, रश्मिका मंडन्ना, विजयशांती, प्रकाश राज आणि राजेंद्र प्रसाद सहाय्यक भूमिकेत आहेत. या चित्रपटानं २६० कोटींची कमाई केली आहे.
04/5
२०२० मधील १०० कोटींच्या घरात मजल मारणारे ५ चित्रपट
दरबार दरबार चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन मुरुगादास यांनी केलं आहे. यांची निर्मिती अल्लाईराजा सुभाषकरण यांनी केलं आहे. या चित्रपटात रजनिकांत यांच्याशिवाय अभिनेत्री नयनतारा, निवेथा थॉमस, सुनील शेट्टी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटानं २०० कोटींची कमाई केली आहे.
05/5
२०२० मधील १०० कोटींच्या घरात मजल मारणारे ५ चित्रपट
बागी ३ बागी ३ हा ६ मार्च २०२० मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी थ्रीलर चित्रपट आहे. अहमद खान यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाची निर्मिती नाडियाडवाला ग्रँडसन यांनी केली आहे. चित्रपटात जयदीप अहलावत, विजय वर्मा, जमील खुरी आणि अंकिता लोखंडे मुख्य कलाकार आहेत. चित्रपटानं १२५ कोटींची कमाई केली आहे.
संबंधित विषय
POLL

मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सला हरवून सलग तिसरा विजय नोंदवणार का? काय वाटते? प्रतिक्रिया नोंदवा.
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा