Advertisement

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार घोषित; 'या' मराठी चित्रपटानं मारली बाजी!

२०१७सालासाठीचे हे राष्ट्रीय पुरस्कार ३ मे २०१८ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रदान करण्यात येणार आहेत. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात येतील.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार घोषित; 'या' मराठी चित्रपटानं मारली बाजी!
SHARES

भारतीय चित्रपट सृष्टीला जर कोणत्या गोष्टीबाबत सगळ्यात जास्त उत्सुकता असेल, तर ती आहे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची! शुक्रवारी ६५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा दिल्लीच्या शास्त्री भवनामध्ये करण्यात आली. प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर चित्रपट निवड करणाऱ्या पॅनलचे अध्यक्ष होते. त्यांच्याशिवाय या १० जणांच्या पॅनलमध्ये इम्तियाज हुसेन, मेहबूब, गौतमी ताडीमल्ला, अनिरूद्ध रॉय चौधरी, राजेश म्हापूसकर अशा नावाजलेल्या सदस्यांचा समावेश होता.

२०१७सालासाठीचे हे राष्ट्रीय पुरस्कार ३ मे २०१८ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रदान करण्यात येणार आहेत. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात येतील.


२०१७चे राष्ट्रीय पुरस्कारांची यादी

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - न्यूटन
सर्वोत्कृष्ट अभिनेता - रिद्धी सेन
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - श्रीदेवी
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - कच्चा लिंबू
सर्वोत्कृष्ट अॅक्शन डिरेक्शन - बाहुबली - द कन्क्लुजन
सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट - बाहुबली - द कन्क्लुजन
सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊण्ड स्कोर - ए. आर. रेहमान (मॉम)

बेस्ट ओरिजिनल स्क्रीनप्ले - तोंडीमुथलम द्रिकसक्षियम (मल्याळी)
बेस्ट ऑडिओग्राफी - व्हिलेज रॉकस्टार्स (आसामी)
बेस्ट साऊण्ड आणि रेकॉर्डिस्ट - वॉकिंग विथ द विंड (लडाखी चित्रपट)
बेस्ट प्रोडक्शन डिझाईन - टेक ऑफ (मल्याळी)
बेस्ट मेकअप आर्टिस्ट - नगर किर्तन (बंगाली)
बेस्ट म्युझिक डिरेक्शन - कात्रू वेलीयीदायी (तामिळ - मणीरत्नम)
बेस्ट कोरिओग्राफी - गोरी तू लठ मार (टॉयलेट एक प्रेम कथा)


इतर भाषिक

बेस्ट गुजराती चित्रपट - जीएचएच
बेस्ट तमिळ चित्रपट - टू लेट
बेस्ट आसामी चित्रपट - इशू
बेस्ट तेलुगु चित्रपट - द गाझी अटॅक
बेस्ट बंगाली चित्रपट - मयुराक्षी
बेस्ट कन्नड चित्रपट - हेब्बेतू रमाक्का
बेस्ट तुलू चित्रपट - पद्दायी
बेस्ट लडाखी चित्रपट - वॉकिंग विथ द विंड
बेस्ट मल्याळी चित्रपट - तोंडीमुथलम द्रिकसक्षियम
बेस्ट ओरिया चित्रपट - हॅलो अर्सी
बेस्ट जसारी चित्रपट - सिंजर


विशेष पुरस्कार

मराठी - म्होरक्या
ओरिया - हॅल्लो अर्सी
मल्याळी - टेक ऑफ
अभिनेता - पंकज त्रिपाठी (न्यूटन)
बेस्ट शॉर्ट फिल्म(फिक्शन) - मयत (मराठी)
बेस्ट सोशल इश्यू फिल्म - आय म बोनी अॅण्ड व्हेल डन
बेस्ट फिल्म आर्ट अॅण्ड कल्चर - गिरीजा - ए लाईफ ऑफ म्युझिक
बेस्ट अॅनिमेशन फिल्म - द फिश करी अॅण्ड टोकरी - द बास्केट
बेस्ट डिरेक्टर - नागराज मंजुळे
स्पेशल ज्युरी अवॉर्ड - अ व्हेरी ओल्ड मॅन विथ एनॉर्मस विंग्ज्स
बेस्ट एज्युकेशन फिल्म - द गर्ल्स वि वेअर अॅण्ड द वुमन वि आर
बेस्ट नॉन फीचर फिल्म - वॉटर बेबी


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा