दीनानाथ नाट्यगृहात स्वस्तिक संगीत महोत्सव

 vile parle
दीनानाथ नाट्यगृहात स्वस्तिक संगीत महोत्सव

विले पार्ले - दीनानाथ नाट्यगृहात संगीतप्रेमींसाठी २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी 8.30 वाजता स्वस्तिक संगीत महोत्सव होणार आहे. या संगीत महोत्सवात सतारवादक निलाद्री कुमार, तबलावादक सत्यजित तलवळकर, आदित्य कल्याणपूर, आेजस अधिया, शुभ महाराज यांच्या सादरीकरणाची मेजवानी मिळू शकेल. चार तालांचे आणि रागांचे प्रस्तुतीकरण या संगीत महोत्सवात होईल. युवा संगीत प्रेमींसाठी निलाद्री कुमार निवडक संगीतकारांसोबत भारतीय शास्त्रीय संगीताचा नजराणा पेश करतील. हा महोत्सव विशेष आणि लक्षणीय असेल, असं आश्वासन निलाद्री कुमार यांनी दिलंय. जास्तीत जास्त संगीतप्रेमींनी या संगीत महोत्सवाला उपस्थित रहावं, असं आवाहनही त्यांनी केलंय.

Loading Comments