Advertisement

अभय देओलने फेअरनेस क्रीमवरून कलाकारांवर साधला निशाणा


अभय देओलने फेअरनेस क्रीमवरून कलाकारांवर साधला निशाणा
SHARES

हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार अभय देओल सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. वर्णभेद ह्या विषयावर त्याने त्याच्या फेसबुक प्रोफाइलवर अश्या काही पोस्ट टाकल्या आहेत जे वाचून सगळ्यांनाच आश्चर्य वाटू लागलंय. त्याने फिल्म इंडस्ट्रीतील अशा बऱ्याच कलाकारांवर निशाणा साधत अशा काही पोस्ट केल्या आहेत ज्यात त्यांनी गोर होण्यासाठी काय काय लावायला हवं अशा जाहिराती केल्या आहेत. 

ह्या यादीत शाहरुख खान, दीपिका पादुकोण, विद्या बालन, सोनम कपूर अशा बऱ्याच कलाकारांची नाव आहेत. आणि प्रत्येक पोस्टमध्ये एखादी टिपण्णी लिहून अभय देओलने वर्णभेदाचा विरोध केला आहे.

अभय ने बुधवारी आपल्या फेसबूक पेज वर अशा जाहिराती पोस्ट केल्या आहेत ज्यातत्या कलाकारांनी  गोर होणाऱ्या कोणती क्रीम लावावी हे सांगितलं आहे. एकीकडे जिथे संपूर्ण जगभर वर्णभेदावरून एवढ्या गोष्टी घडत आहेत आणि दुसरीकडे आपणच गोर होऊन स्वतःचा रंग कसा बदलावा हे सांगत आहोत.

विशेष म्हणजे वर्णभेदाचा मुद्दा उचलून फेअरनेस क्रीमची जाहिरात करण्यास स्पष्ट नकार देणाऱ्या कलाकारांचं अभयने कौतुकही केलं आहे. माझ्या चित्रपटसृष्टीतले सगळेच कलाकार बेजबाबदार नाहीत, असं सांगत त्याने ‘हिंदुस्थान टाइम्स’ या वृत्तपत्रातील एका रिपोर्टची लिंकही शेअर केली आहे.वर्णभेदाचा ठाम विरोध करणारी अभिनेत्री नंदिता दास, बंडखोर अभिनेत्री कंगना रनौत, हरहुन्नरी अभिनेता रणदीप हुडा, रणबीर कपूर, अभिनेत्री स्वरा भास्कर यांचं अभयने कौतुक केलं आहे.

सध्या सोशल मीडियावर अभय देओलच्या या पोस्टची चर्चा रंगली आहे. वर्णभेदाविरोधात आवाज उठवल्याप्रकरणी अभयचं अनेक यूझर्सनी कौतुक केलं आहे.अभय देओल ने अशा बऱ्याच पोस्ट टाकल्या आणि त्याला खूप कमी वेळात लोकांचा खूप प्रतिसाद मिळालाय.संबंधित विषय
Advertisement