Advertisement

प्रेमाचा गोडवा जपणं हाच ‘व्हॅलेंण्टाईन डे’


प्रेमाचा गोडवा जपणं हाच ‘व्हॅलेंण्टाईन डे’
SHARES

मुंबई - प्रेमिकांसाठी महत्वाचा असलेला दिवस म्हणजे 14 फेब्रुवारी. आपल्याला आवडणारी कलाकार मंडळी ‘व्हॅलेंण्टाईन डे’ च्या दिवशी काय करतात? असे अनेक प्रश्न कलाकरांच्या चाहत्यांमध्ये निर्माण होतात. अभिनेता अभिजीत खांडकेकरच्या चाहत्यांसाठीही त्याच्या ‘व्हॅलेंण्टाईन डे' विषयी कुतूहल नक्कीच असेल. यंदाचा 'व्हॅलेंण्टाईन डे' तो कसा साजरा करणार? हे आम्ही त्याच्याकडूनच जाणून घेतलं.

'व्हॅलेंण्टाईन डे' विषयी तुझं मत ?

सध्या चांगुलपणा हरवत चालला आहे. 'व्हॅलेंण्टाईन डे' च्या निमित्ताने सर्वांशी आपुलकी आणि प्रेमाने वागत प्रेमाचा, आपलेपणाचा गोड संदेश आपण सगळ्यांना द्यायला हवा असं मला वाटतं. हा दिवस फक्त कपल्सनेच सेलिब्रेट करावा असं नाही तर प्रत्येक नात्यामधला प्रेमाचा गोडवा वाढावा यासाठी या दिवसाचं औचित्य साधायला हवं.

यंदाचा व्हॅलेंण्टाईन डे'तू कशाप्रकारे साजरा करणार?

आमच्या लग्नाचा वाढदिवस 1 फेब्रुवारीला असल्याने 1 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी आम्ही 'व्हॅलेंण्टाईन वीक' सेलिब्रेट करतो. यंदा कामाचं व्यस्त शेड्यूल असल्यामुळे हटके काहीतरी करणं शक्य नसलं तरी एक छानसं प्लेझंट सरप्राईज सुखदाला देणार आहे.

'व्हॅलेंण्टाईन डे'ची एखादी आठवण ?

गेल्यावर्षी मी सुखदासाठी स्वत:च्या हाताने स्वयंपाक बनवला होता. तो कितपत चांगला झाला ते माहित नाही पण सुखदासाठी तो एक सुखद धक्का होता. तसंच एका 'व्हॅलेंण्टाईन डे' ला आम्ही गेट ऑफ इंडियाला फिरायला गेलो होतो. तिथे मी सुखदासाठी एक यॉर्ट बुक केली होती. अथांग समुद्राचं आणि सुर्यास्ताचं विहंगम दृश्य मनात साठवत आम्ही हा दिवस साजरा केला होता. 5 जी इंटरनॅशनल प्रस्तुत आणि सचिन कटारनवरे निर्मित भय या माझ्या आगामी चित्रपटातील एक रोमँटिक गीत आम्ही क्रुझवर चित्रीत केलं आहे. या गाण्याच्या निमित्ताने आम्ही सेलिब्रेट केलेल्या रोमँटिक डेटच्या आठवणीला पुन्हा उजाळा मिळाला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा