Advertisement

'या' कारणास्तव बिग बॉस हिंदीमधून अभिजीत बिचुकले बाहेर

बिग बॉस हिंदीमध्ये अभिजीत बिचुकले सहभागी होणार नाही.

'या' कारणास्तव बिग बॉस हिंदीमधून अभिजीत बिचुकले बाहेर
SHARES

सलमान खानचा शो बिग बॉस १५ काही काळापासून टीआरपीच्या शर्यतीत मागे पडला आहे. शोला पुन्हा शर्यतीत आणण्यासाठी निर्माते प्रयत्न करत आहेत.

अलीकडेच अशी बातमी आली होती की मेकर्स लवकरच शोमध्ये काही वाइल्ड कार्ड दाखल करू शकतात, ज्यामुळे शोमध्ये नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. 

स्पर्धकांमध्ये अभिजीत बिचुकले, देवोलिना भट्टाचार्जी, रश्मी देसाई आणि राखी सावंतची नावे आहेत. पण आता त्यात अडथळा निर्माण झाला आहे. अभिजीत यापुढे या शोचा भाग बनू शकणार नाही.

बिग बॉसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी अभिजीतला हॉटेलमध्ये १५ दिवस क्वारंटाइन करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना महामारीमुळे आता तो बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश करू शकणार नाही.

शोला चांगला प्रतिसाद मिळावा म्हणून अभिजीत घरात राडा करेल असं मेकर्सना वाटत होते. पण सध्या कोरोनामुळे तसं होणार नाही. आता ते आणखी काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली असतील.

अभिजीत वगळता, लवकरच तीन नवीन देवोलिना भट्टाचार्जी, राखी सावंत आणि रश्मी देसाई या शोमध्ये प्रवेश करणार आहेत. राखी गेल्या सीझनमध्येही दिसली होती. त्याच्या येण्यानं शोच्या टीआरपीमध्ये जबरदस्त वाढ पाहायली मिळाली होती.

राखीनं कधी तिचा ज्युली अवतार इथं दाखवला तर कधी अभिनव शुक्लासोबत तिचा रोमँटिक अंदाज दाखवून सर्वांचं मनोरंजन केलं आहे.

यावेळी तिचा नवरा सर्वांच्या समोर येणार आहे. यासंदर्भातील प्रोमो देखील प्रदर्शित झाले आहेत. अभिजीत ऐवजी, निर्माते आता नवीन स्पर्धकाच्या शोधात आहेत जो शोमध्ये मनोरंजनाची अधिक भर पडेल.हेही वाचा

छत्रपती ताराराणींची शौर्यगाथा सातासमुद्रापार गाजणार

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा