'ती सध्या काय करते'चा टिझर लॉन्च

Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - सतीश राजवाडेंनी दिग्दर्शित केलेला ' ती सध्या काय करते ' हा नवा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अंकुश चौधरी आणि तेजश्री प्रधान ही जोडी पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचा टिझर नुकताच लॉन्च झालाय. या सिनेमात अंकुश चौधरीच्या कॉलेजच्या काळातली भूमिका लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे साकारणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अभिनय सिनेसृष्टीत पदार्पण करतोय. सिनेमात तेजश्री प्रधान बरोबर आर्या आंबेकरही दिसणार आहे. आर्याचा ही हा पहिलाच सिनेमा आहे. बालपण संपलं की मित्र-मैत्रिणी एकमेकांपासून दुरावतात, पण कधीतरी आपल्याला त्यांच्यातल्या काही खास व्यक्तींची आठवण येते आणि प्रश्न पडतो की ती सध्या काय करत असेल ? हाच विषय या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

Loading Comments