Advertisement

अभिषेक-ऐश्वर्या बाप्पाच्या दर्शनाला


अभिषेक-ऐश्वर्या बाप्पाच्या दर्शनाला
SHARES

भायखळा- सगळीकडे गणपती उत्सवाची धूम आहे. गणपतीवर सगळ्यांचीच श्रद्धा असते. मग त्यात कलाकार मंडळी तरी कसे मागे राहतील. शनिवारी बॉलीवुड अभिनेता अभिषेक आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन यांनी भायखळा परिसरातल्या माणकेश्वर गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी दोघांनी गणपतीची आरतीही केली. बाप्पाच्या दर्शनासाठी एकीकडे अभषेक-ऐश्वर्या हजर झाले होते, तर त्यांना पहाण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे गर्दीला आवरताना मंडळ कार्यकर्ते आणि पोलिसांच्या नाकी नऊ आल्याचं पहायला मिळालं. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा