इन्स्टाग्रामवर श्रध्दा कपूर नंबर वन!

इन्स्टाग्रामवर श्रद्धा १०० गुणांसह अव्वल स्थानावर असून, अलिया भट्ट ८५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. दीपिका पदुकोण ६८ गुणांसह तिसऱ्या स्थानावर, तर प्रियंका चोप्रा ६६ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

  • इन्स्टाग्रामवर श्रध्दा कपूर नंबर वन!
SHARE

मागील काही दिवसांपासून ‘स्त्री’ या सिनेमामुळे चर्चेत राहिलेली श्रध्दा कपूर स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार इन्स्टाग्रामवर सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी बनली आहे. आलिया भट्ट, प्रियंका चोप्रा आणि दीपिका पादुकोण या मात्तब्बर अभिनेत्रींना मागे टाकत श्रद्धाने प्रथमच इंस्टाग्रामवर नंबर वन स्थान पटकावण्यात यश मिळवलं आहे.  १०० गुणांसह अव्वल

अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित हे रेटींग घोषित केलं आहे. इन्स्टाग्रामवर श्रद्धा १०० गुणांसह अव्वल स्थानावर असून, अलिया भट्ट  ८५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. दीपिका पदुकोण ६८ गुणांसह तिसऱ्या स्थानावर, तर प्रियंका चोप्रा ६६ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. सोनम कपूर अहुजा ५९ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.


सातव्या स्थानावरून अग्रस्थानी

स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह-संस्थापक अश्वनी कौल यांच्या म्हणण्यानुसार, एका महिन्याच्या आत सातव्या स्थानावरून थेट अग्रस्थानी पोहोचलेल्या श्रद्धाने आपल्या बॉलीवूडमधल्या सर्व स्पर्धकांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे. तिची वाटचाल नक्कीच उल्लेखनीय आहे. राजकुमार राव सोबतचा ‘स्त्री’ आणि शाहिद कपूर सोबतचा ‘बत्ती गुल मीटर चालू’ या सिनेमांमुळे तिची खूप पब्लिसिटी होत आहे. यावर आधारित श्रध्दाच्या इन्स्टा पोस्ट आणि इन्स्टा स्टोरीज असतात. श्रध्दाच्या इंस्टाग्रामच्या लोकप्रियतेत वाढ होण्यामागे हेच कारण आहे.


४ भारतीय भाषांमधून माहिती 

श्रध्दा आपल्या कुटूंबासोबतचे फोटोही इन्स्टाग्रामवर पोस्ट करते. ज्यामुळे तिच्या लोकप्रियतेत वाढ होत असते. चार भारतीय भाषांमधील ६०० हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून ही माहिती गोळा केली जाते. या बळावरच बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंगपर्यंत पोहोचण्यात येतं.हेही वाचा - 

दिग्दर्शनाकडे वळताना संजय खापरेने केली ‘गलती से मिस्टेक’

‘अलबत्या गलबत्या’चं शतक आणि ५ प्रयोगांचा विक्रम
संबंधित विषय
ताज्या बातम्या