Advertisement

दिग्दर्शनाकडे वळताना संजय खापरेने केली ‘गलती से मिस्टेक’

आजवर विविधांगी भूमिका साकारणारा अभिनेता संजय खापरे आता दिग्दर्शकाच्या रुपात रसिकांच्या भेटीला येत आहे. कधी धीरगंभीर, तर कधी विनोदी भूमिका साकारणाऱ्या संजयने दिग्दर्शनाकडे वळताना विनोदी विषय निवडला आहे.

दिग्दर्शनाकडे वळताना संजय खापरेने केली ‘गलती से मिस्टेक’
SHARES

एखाद्या मल्टीस्टारर मराठी सिनेमातील अगदी लहानशा भूमिकेतही लक्ष वेधून घेण्याचं कसब अंगी असलेल्या अभिनेता संजय खापरे ‘गलती से मिस्टेक’ म्हणत दिग्दर्शनाकडे वळला आहे.

आजवर विविधांगी भूमिका साकारणारा अभिनेता संजय खापरे आता दिग्दर्शकाच्या रुपात रसिकांच्या भेटीला येत आहे. कधी धीरगंभीर, तर कधी विनोदी भूमिका साकारणाऱ्या संजयने दिग्दर्शनाकडे वळताना विनोदी विषय निवडला आहे. ‘गलती से मिस्टेक’ असं शीर्षक असलेल्या या नाटकाच्या दिग्दर्शनासोबतच संजय मुख्य भूमिकेतही दिसणार आहे. या नाटकाविषयी ‘मुंबई लाइव्ह’शी संवाद साधत संजयने ‘गलती से मिस्टेक’मधील गंमती जंमती सांगितल्या.


मराठी-हिंदी सिनेमांचा अनुभव

संजयने आजवर बऱ्याच सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. यात ‘लय भारी’ आणि ‘दगडी चाळ’ या हिट मराठी सिनेमांसह ‘रॉकी हँडसम’ सारख्या हिंदी सिनेमांचाही समावेष आहे. ‘दगडी चाळ’मध्ये संजयने साकारलेला मामा दीर्घकाळ स्मरणात राहणारा आहे. अभिनयाच्या या शिदोरीच्या बळावरच संजयने दिग्दर्शनात पाऊल ठेवलं आहे.


इच्छा तेथे मार्ग

दिग्दर्शनाकडे वळण्याबाबत संजय म्हणाला की, आजवर मी बऱ्याच मोठमोठ्या दिग्दर्शकांच्या सिनेमात काम करताना त्यांच्याकडून खूप काही शिकलो आहे. त्याचा उपयोग दिग्दर्शन करताना होत आहे. खरंतर कधी तरी दिग्दर्शनाकडे वळायचं होतंच. केवळ योग्य संहिता आणि चांगल्या टीमच्या प्रतीक्षेत होतो. ‘गलती से मिस्टेक’च्या निमित्ताने योग जुळून आला.


कलाकारच नाटक घडवतात

कोणतंही नाटक हे दिग्दर्शकाचं न राहता पुढेपुढे ते त्यातील कलाकारांचं बनतं, असं माझं मत आहे. त्यातील कलाकारच ते घडवत असतात असं मी मानतो. त्यामुळे या नाटकात अभिनयासोबतच दिग्दर्शनही करत आहे. मीच या नाटकाचा दिग्दर्शक असून अभिनयही करत असल्याने प्रत्येक प्रयोगागणिक काही सुधारणा कराव्याशा वाटल्या तर करणं सोपं जाईल.


वर्षभरापासून प्लॅनिंग

या नाटकाचं प्लॅनिंग वर्षभरापासून सुरू होतं. नाटकाचे निर्माते उदय साटम खूप चांगले मित्र असल्याने नाटकावर विचारविनीमय सुरू होता. नाटकाची टीम फार मोठी नको, असं आम्ही ठरवलं होतं. टीम छोटी असली की दौरे करणं सोपं जातं. हे नाटक फार कमी व्यक्तिरेखांभोवती फिरतं त्यामुळे माझ्यासोबत चेतना भट आणि आशिष पवार हे दोनच कलाकार यात आहेत.


विनोदीच का?

मराठी नाट्यरसिकांना जशी विनोदी नाटकं आवडतात तशी गंभीर नाटकंही भावतात, पण सणासुदीच्या हंगामात नाट्य रसिकांच्या सेवेत मला विनोदी नाटक सादर करायचं होतं. प्रासंगिक, अंगिक आणि शाब्दिक विनोदांचा वापर ‘गलती से मिस्टेक’मध्ये मोठ्या खुबीने करण्यात आल्याने हे नाटक रसिकांसाठी पैसा वसूल ठरेल.


हेही वाचा - 

‘अलबत्या गलबत्या’चं शतक आणि ५ प्रयोगांचा विक्रम

शिरीष राणेचे ‘तेरा दिवस प्रेमाचे’

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा