Advertisement

कधीच मोठी होऊ नकोस! - अक्षयची मुलगी निताराला विनंती...


कधीच मोठी होऊ नकोस! - अक्षयची मुलगी निताराला विनंती...
SHARES

हल्ली सोशल मीडिया हा सामान्यांपासून ते सेलिब्रिटी मंडळींच्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाला आहे. त्यामुळे ही मंडळी आपल्या आयुष्यातल्या छोट्या क्षणांपासून महत्त्वाच्या घडामोडींपर्यंत सर्वकाही सोशल मीडियावर शेअर करत असतात. आणि अर्थात, त्यांच्या फॅन फॉलोविंगमुळे या गोष्टी लगेच व्हायरलही होतात. अभिनेता अक्षय कुमारने शेअर केलेला असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण हा व्हिडिओ काही फक्त अक्षय कुमारचा नाही, तर त्यामध्ये त्याची लाडकी लेक नितारासुद्धा आहे. आणि नितारा या व्हिडिओमध्ये चक्क अक्षय कुमारची दाढी करताना दिसत आहे.

25 सप्टेंबर हा अक्षय कुमारच्या मुलीचा म्हणजेच निताराचा वाढदिवस. यंदा अक्षय निताराचा ५ वा वाढदिवस तिच्यासोबत सेलिब्रेट करत आहे. अगदी सकाळपासून अक्षय नितारासोबतच आहे. अक्षय कुमारने तिला खूप वेगळ्या आणि गोड पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षयने त्याच्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय, ज्यात त्याची मुलगी नितारा अक्षयची दाढी करताना दिसत आहे. या व्हिडिओसोबतच अक्षयने आपल्या लाडक्या लेकीसाठी एक गोड संदेशही लिहिलाय..अक्षय म्हणतो, 'माझ्या प्रत्येक दिवसातला सर्वात आवडता घटक, माझी मुलगी नितारा माझी दाढी करतेय. माझ्यासाठी हे क्षण खूप खास आहेत! नितारा तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा! फक्त एक विनंती आहे..कधीच मोठी होऊ नकोस!'




डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा