Advertisement

'संभाजी' मालिकेचे पुढील भाग अजिबात चुकवू नका!


'संभाजी' मालिकेचे पुढील भाग अजिबात चुकवू नका!
SHARES

झी मराठीवरील स्वराज्य रक्षक 'संभाजी' या मालिकेत 'शंभूराजे' म्हणजेच अमोल कोल्हे यांची एन्ट्री कधी होणार? हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या प्रेक्षकांची प्रतीक्षा आता संपणार आहे. कारण या मालिकेच्या पुढील भागात शंभूराजांचा पराक्रम प्रेक्षकांना बघता येणार आहे.


मालिकेत पुढे काय?

शंभूराजांनी लिहिलेला बुधभूषण ग्रंथ येसूबाईंच्या हाती लागतो. त्याच्या उत्सुकतेपोटी त्या दरबारात या ग्रंथाचे वाचन ठेवतात. याच दरम्यान अणाजी आणि शंभूराजेंमध्ये मतभेदाची ठिणगी पडते आणि नव्या राजकारणाला सुरुवात होते. त्याचबरोबर येत्या भागांमध्ये येसुबाई आणि शंभूराजांची पहिली भेट कशी होते? त्यांच्या नात्याचा पदर मालिकेच्या निमित्ताने उलगडत जाणार आहे.



अमोल कोल्हेंची दुहेरी भूमिका

निर्माता आणि अभिनेता अशी दुहेरी भूमिका डॉ. अमोल कोल्हे यांच्या खांद्यावर असून या भूमिका ते अतिशय शिताफीने हाताळत आहेत. डॉ. अमोल कोल्हेंनी याआधी छत्रपती शिवाजी महराजांची भूमिका साकारली होती. त्याचप्रमाणे नाटकाच्या माध्यमातून त्यांनी शंभुराजे यांची भूमिका रंगभूमिवर साकारली होती.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा