Advertisement

'श्रीदेवी यांचा सन्मान राखा', अनिल कपूरने ट्विटरवरून प्रसार माध्यमांना सुनावले!


'श्रीदेवी यांचा सन्मान राखा', अनिल कपूरने ट्विटरवरून प्रसार माध्यमांना सुनावले!
SHARES

अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अचानक एक्झिटमुळ तिच्या कुटुंबियांबरोबरच तिच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. श्रीदेवी यांच्या मृत्यूप्रकरणी केलेल्या कव्हरेजमुळे प्रसार माध्यमं सगळ्यांच्याच निशाण्यावर आली. अनेकांनी माध्यमांची खिल्ली देखील उडवली. आता यावरून अनिल कपूर यांनी ट्वीट करत श्रीदेवी आणि कुटुंबियांच्या खासगी आयुष्याचा सन्मान राखावा, अशी विनंती प्रसार माध्यमांना केली आहे.

'कपूर कुटुंबीयांच्या खासगी आयुष्याचा प्रसार माध्यमांनी मान राखावा. श्रीदेवी संपूर्ण आयुष्य सन्मानाने जगल्या आणि यापुढेही तुम्ही त्यांचा सन्मान राखावा', असं ट्वीट अनिल कपूर यांनी केलं आहे.


अनिल कपूर यांनी ट्वीटरद्वारे श्रीदेवी यांच्या निधनावर पत्र लिहीत खेद व्यक्त केला आहे. 'श्रीदेवी यांची प्रतिभा, सौंदर्य अवर्णनीय होतं. श्रीदेवी यांना त्यांच्या चाहत्यांकडून कायमच प्रेम मिळालं आहे. श्रीदेवी यांचे चाहते, सहकारी, मित्र-परिवार हे सर्वजण आमच्या दुखात सहभागी झाले. श्रीदेवी यांना मिळालेलं प्रेम त्यांच्या खुशी आणि जान्हवी या मुलींच्या मनात कायम राहील', अशी भावना अनिल कपूर यांनी या पत्रात म्हटलं आहे. त्याचबरोबर अनिल कपूर यांनी आणखी एक ट्वीट करत मुंबई पोलिसांचेही आभार मानले आहेत.



हेही वाचा

अभिनेत्री श्रीदेवी अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा