Advertisement

दाक्षिणात्य अभिनेते चिरंजीवींना कोरोनाची लागण

६५ वर्षीय चिरंजीवी यांनी स्वतः सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.

दाक्षिणात्य अभिनेते चिरंजीवींना कोरोनाची लागण
SHARES

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते चिरंजीवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. ६५ वर्षीय चिरंजीवी यांनी स्वतः सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी ट्विटरवर यासंदर्भात ट्विट केलं आहे.

चिरंजीवी यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितलं आहे की, "मला सध्या कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसत नाहीयेत. मी आता होम क्वारंटाइन आहे. मागील ४ ते ५ दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी कृपया कोविड चाचणी करून घ्यावी ही विनंती. मी माझ्या आरोग्याबद्दलचे अपडेट देत राहिल,'' अशी पोस्ट त्यांनी टाकली आहे.

चिरंजीवी लवकरच त्यांच्या आगामी आचार्य या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार होते. सेटवर जाण्यापूर्वी त्यांनी खबरदारी म्हणून कोरोना चाचणी करून घेतली ज्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे मार्चमध्ये 'आचार्य'चे शूटिंग थांबवण्यात आलं होतं. या चित्रपटात चिरंजीवी व्यतिरिक्त काजल अग्रवालसुद्धा मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाचा निर्माता चिरंजीवी यांचा मुलगा राम चरण आहे तर दिग्दर्शन कोराताला शिव करत आहेत.

चिरंजीवी यांनी ७ नोव्हेंबरला हैदराबादच्या प्रगती मैदानावर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी मास्क घातला नव्हता. चिरंजीवी व्यतिरिक्त दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनही यावेळी उपस्थित होते.



हेही वाचा

म्युझिकचा 'जुनून' असलेली कलाकार!

“मास्क नाही, तर थिएटरमध्ये प्रवेश नाही”

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा