Advertisement

“मास्क नाही, तर थिएटरमध्ये प्रवेश नाही”

थिएटरमध्येसुद्धा ‘नो मास्क नो एन्ट्री’ नियम असला पाहिजे.. नाट्यगृहाबाहेरील खाण्याचे स्टॉल्स देखील नियम पाळतात की नाही हे पाहिलं पाहिजे, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी केल्या.

“मास्क नाही, तर थिएटरमध्ये प्रवेश नाही”
SHARES

महाराष्ट्र सरकारने सिनेमागृह आणि नाट्यगृह ५० टक्के क्षमतेसह सुरू करण्यास नुकतीच परवानगी दिली आहे. मात्र अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नसल्याने प्रेक्षकांसह, कलाकार आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी कोरोनासंदर्भातील सर्व सूचनांचं काटेकोरपणे पालन करून काळजी घेणं गरजेचं आहे. मास्क नाही तर थिएटरमध्ये (theater) प्रवेश नाही, हे सूत्र पाळण्याचं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

मराठी रंगभूमीदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी नाट्य निर्माते, कलाकार यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय हे देखील सहभागी झाले होते.

यावेळी उद्धव ठाकरे (uddhav thackeray) म्हणाले की, कोरोना-लाॅकडाऊनच्या काळात निर्मात्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी नाट्यगृहांच्या भाड्याच्या बाबतीत शासन नक्की विचार करेल. ‘मराठी पाऊल पडते पुढे’ असं आपण म्हणतो; पण आता पुढील काळात ते अत्यंत खबरदारीने टाकणं गरजेचं आहे.

हेही वाचा- म्हणून मराठी सिनेमाच्या राखीव ‘शो’साठी सरकार आग्रही- उद्धव ठाकरे

लंडन आणि युरोपमध्ये कोरोनाचे संकट परत वाढलं आहे. चित्रपट आणि थिएटर  (marathi theater)यात फरक हा आहे की इथं रिटेक नाही. त्यामुळे अधिक दक्षता घेणं गरजेचं आहे. प्रत्येक निर्मात्याने कलाकारांचे चेकअप करावं, स्टेजवर कलाकारांनी अंतर ठेवावं, स्वच्छता ठेवावी. थिएटरमध्येसुद्धा ‘नो मास्क नो एन्ट्री’ नियम असला पाहिजे.. नाट्यगृहाबाहेरील खाण्याचे स्टॉल्स देखील नियम पाळतात की नाही हे पाहिलं पाहिजे, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी केल्या.

सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख म्हणाले की, कोरोनामुळे (coronavirus) बऱ्याच कालावधीनंतर नाट्यगृहं उघडत आहेत. अनेक छोट्या मोठ्या समस्या येतील. आपण सर्वांनी बरोबर राहून यातून मार्ग काढू.

यावेळी आदेश बांदेकर, सुबोध भावे, मंजिरी भावे, अमेय खोपकर, प्रदीप कबरे, बिभीषण चवरे, डॉ.गणेश चंदनशिवे, प्रदीप वैद्य, प्रसाद कांबळी, यांनी चर्चेत सहभाग घेऊन काही सूचनाही केल्या.

(no mask no entry in theaters says maharashtra cm uddhav thackeray)

हेही वाचा- यंदा फटाकेमुक्त दिवाळी‌? राज्य मंत्रिमंडळात मागणी करणार...

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा