Advertisement

म्युझिकचा 'जुनून' असलेली कलाकार!

देवयानी एक अस्सल मुंबईकर असून त्यांनी कुटुंबाला कोणतीही सांगीतिक पार्श्वभूमी नसताना स्वतःच्या अंगभूत गुण, मेहनत आणि जिद्दीवर संगीत क्षेत्रात नाव कमावले आहे.

म्युझिकचा 'जुनून' असलेली कलाकार!
SHARES

देवयानी बेंद्रे या भारतीय चित्रपट व संगीत क्षेत्रातील सुप्रसिद्ध गायिका, संगीतकार व कलाकार आहेत. त्या 'जुनून' म्युझिक ग्रुपच्या संस्थापिका असून हा ग्रुप भारतभरात तसेच परदेशातही कला सादर करतो. देवयानी बेंद्रे यांच्या गायनाची कीर्ती सातासमुद्रापार पोहचली असून आजवर त्यांनी अमेरिका, इस्राईल, दुबईसह दक्षिण आफ्रिकेत आपली गायन कला सादर केली आहे. त्या एक अस्सल मुंबईकर असून त्यांनी कुटुंबाला कोणतीही सांगीतिक पार्श्वभूमी नसताना स्वतःच्या अंगभूत गुण, मेहनत आणि जिद्दीवर संगीत क्षेत्रात नाव कमावले आहे.
देवयानी तेव्हा एस एल & एस एस मुलींच्या माध्यमिक शाळेत इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत होत्या. 

जेव्हा शाळेचे मुख्याध्यापक यांनी बाल देवयानीच्या जादुई आवाजाची पारख केली आणि देवयानीच्या आई-वडिलांना देवयानीला गायन शिकवण्यासाठी प्रोत्साहीत केले. सुरुवातीला पारंपारिक विचारांच्या समाजाचा पगडा असल्याने देवयानीचे आई-वडील संगीताचे शिक्षण देण्याविषयी साशंक होते. पण नंतर सर्व सुरळीत झाले व देवयानीने शास्त्रीय संगीताचे शिक्षण सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक वामनराव सडोलीकर, त्यांच्या कन्या श्रुती सडोलीकर यांच्याकडे घेतले. त्यानंतर देवयानीने सुप्रसिद्ध गायक फिरोज दस्तूर तसेच भवदीप जयपूरवाले यांच्याकडे गायनाचे धडे गिरवले. शाळेत आठव्या यत्तेत शिकत असतानाच देवयानीने मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले होते. यामध्ये मराठी चित्रपट 'डॉक्टर डॉक्टर' आणि अमिताभ बच्चन यांनी पहिल्यांदा मराठीत अभिनय केलेला मराठी चित्रपट 'करायचं ते दणक्यात' या चित्रपटांचा समावेश होतो.  

देवयानी बेंद्रे यांनी बीकॉम पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून त्या आयसीडब्ल्यूआय आहेत. त्यांनी आपले पदवीचे शिक्षण भवन कोलेज चौपाटी, मुंबई येथून पूर्ण केले आहे. गायन कलेच्या अद्भुत गुणांमुळे देवयानीने महाविद्यालयीन पातळीवरील सर्व गायन स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आणि त्यांचे राहते घर हे पुरस्कार आणि प्रशस्तीपत्रके यांनी अक्षरश: भरले. गायन स्पर्धांमधील यशाने देवयानीचा आत्मविश्वास दुणावला व त्यांनी गायक म्हणून करिअर निवडण्याचे ठरवले. देवयानीच्या बाबांनी पुढील मार्गदर्शनासाठी देवयानीची संगीतकार व संगीत संयोजक अनिल मोहिले यांची भेट घडवली. संगीतकार अनिल मोहिले हे भारतरत्न गानसरस्वती लता मंगेशकर यांचे निकटवर्तीय मानले जातात. मोहिले यांच्याकडे देवयानीच्या गायनावर संस्कार करण्यात आले, त्यातून एक यशस्वी व्यावसायिक गायिका म्हणून उदयास येण्यास देवयानीला मोठी मदत झाली. गायन क्षेत्रात एव्हाना देवयानीच्या जादुई आवाजाची कीर्ती पसरू लागली होती. त्यातूनच अनेक दिग्गज गायकांसमवेत देवयानी बेन्द्रे यांना गायनाची संधी मिळाली. यामध्ये सुप्रसिद्ध गायक उदित नारायण, सुनिधी चौहान, नितीन मुकेश, जावेद अली आणि उषा मंगेशकर यांचा समावेश होतो.

सुप्रसिद्ध गायक नितीन मुकेश यांच्या समवेत देवयानी बेंद्रे यांनी मुख्य गायिका म्हणून सबंध भारतभर गायन दौरे केले व विविध कार्यक्रमातून गायन कला सादर केली आहे. हा भारत दौरा सुमारे पाच वर्षे सुरु राहिला. या काळात आयुष्यातील पहिला लाइव्ह गाण्याचा कार्यक्रम देवयानी बेंद्रे यांनी अल्बर्ट हॉल, न्यू जर्सी, अमेरिका येथे सादर केला. हा अनुभव आणि प्रेक्षकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे देवयानी यांना आपले करिअर सिद्ध करण्यास मोठी प्रेरणा मिळाली. आजवर देवयानी यांनी अनेक संगीत कंपन्यांच्या अल्बमसाठी गीते गायली आहेत, यामध्ये व्हीनस (मोरया श्री गजानन) आणि टी सिरीज (तेरी दिवानी) या गाजलेल्या अल्बम व कंपन्यांचा समावेश होतो. देवयानी बेंद्रे या जागतिक कीर्तीच्या भारतीय कलावंत आहेत, ज्यांनी काश्मिरी, तेलुगु, हिंदी, बंगाली, मराठीसह हिब्रू आणि आफ्रिकेतील भाषांमध्ये गीते गायली आहेत.

जगाची दारे भारतासाठी उघडू लागण्याच्या सुरुवातीचा तो काळ होता. तेव्हा आज लोकप्रिय असलेल्या सा रे गा मा किंवा इंडियन आयडॉल सारख्या गुणवान गायक शोधण्याच्या स्पर्धा नव्हत्या. माध्यमांची चौकट विस्तारलेली नव्हती. अशा काळात आपले अंगभूत गायन कौशल्य, अपर मेहनत आणि जिद्दीच्या बळावर गायन क्षेत्रात आपली यशस्वी कारकीर्द निर्माण करणाऱ्या देवयानी बेंद्रे यांच्या सारख्या गुणवान गायिका विरळाच. देवयानी बेंद्रे या स्वतःच्या हिमतीने भारतीय संगीत क्षेत्रात पाय रोवून यशस्वीपणे उभ्या आहेत. आपल्या जादुई आवाज आणि गायनासाठीच्या आत्मीयता आणि त्यागातून त्यांनी ये अभूतपूर्व यश संपादन केले आहे.

देवयानी बेंद्रे यांचे विविध सोशल मिडीया अकाऊंटवर चाहते आणि प्रेक्षकांची ओढ लागलेली असते. देवयानी बेंद्रे यांच्या पेजवर जाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा