Advertisement

सुंदर नात्याची अनोखी भाऊबीज

‘व्हॅनिला, स्ट्रॅाबेरी अँण्ड चॉकलेट’ या आगामी मराठी चित्रपटाची नायिका जानकी पाठक दरवर्षीप्रमाणे यंदाही तिचा लाडका कुत्रा कॅस्पर याच्यासोबत भाऊबीज साजरी करणार आहे.

सुंदर नात्याची अनोखी भाऊबीज
SHARES

बहीण आणि भावाचं नातं हे जगातील सुंदर नात्यांपैकी एक आहे. असंच एका बहीण-भावाचं आगळंवेगळं नातं ‘व्हॅनिला, स्ट्रॅाबेरी अँण्ड चॉकलेट’ या आगामी मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहे.



नात्यांचा उत्सव 

‘तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना’ असंच भाऊ-बहिणीच नातं असतं. या नात्याची हीच खासियत आहे. भाऊ- बहिणीचं नातं साजरं करणारा भाऊबीज हा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्या नात्यातला गोडवाही भाऊबीज द्विगुणीत करतो. नात्यांचा हा उत्सव साजरा करण्यासाठी आता सगळेच भाऊ- बहीण उत्सुक असतील.  


कॅस्परसोबत भाऊबीज

अशाच एका बहिणीने आपल्या भावाचं कौतुक करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. पण तिची ही भाऊबीज मात्र आगळीवेगळी आहे. ‘व्हॅनिला, स्ट्रॅाबेरी अँण्ड चॉकलेट’ या आगामी मराठी चित्रपटाची नायिका जानकी पाठक दरवर्षीप्रमाणे यंदाही तिचा लाडका कुत्रा कॅस्पर याच्यासोबत भाऊबीज साजरी करणार आहे. 


छानसं गिफ्टसुद्धा 

एक भाऊ बहिणीसाठी जे काही करतो ते सगळचं कॅस्पर जानकीसाठी करतो. कोणत्याही प्रसंगात तो तिच्यासोबत असतो. आणि म्हणूनच जानकी दरवर्षी कॅस्परसोबत आपली भाऊबीज साजरी करते. ही भाऊबीज साजरी करताना ती कॅस्परला ओवाळणार आहे. त्याला त्याच्या आवडीचे पदार्थ खाऊ घालणार आहे. इतकंच नाही तर तिने त्याच्यासाठी एक छानसं गिफ्टसुद्धा आणलं आहे.


व्हॅनिला, स्ट्रॅाबेरी अँण्ड चॉकलेट

तिचं हेच प्राणीप्रेम ‘व्हॅनिला, स्ट्रॅाबेरी अँण्ड चॉकलेट’ चित्रपटातही पहायला मिळणर आहे. ‘व्हॅनिला, स्ट्रॅाबेरी अँण्ड चॉकलेट’ हा सिनेमा १६ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची निर्मिती, कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व दिग्दर्शन अशी सगळी जबाबदारीही गिरीश विश्वनाथ यांनी सांभाळली आहे. नवोदित अभिनेत्री जानकी पाठकसोबत रवी काळे,  राजश्री निकम, राधिका देशपांडे, क्षितीज देशपांडे, विनोद जाधव या कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत.



हेही वाचा - 

'ही' आहे सिनेसृष्टीतली फ्रेश जोडी!

रिंकूच्या 'कागर'ला व्हेलेंटाइन डेचा मुहूर्त




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा