Advertisement

'ही' आहे सिनेसृष्टीतली फ्रेश जोडी!

संस्कृती नेहमीच आपल्या इन्स्टाग्राम अकांउंटवर अॅक्टिव असते. मागील काही दिवसांपासून तिच्या इन्स्टापोस्ट आणि स्टोरीजमध्ये सुमेधचा खूप समावेश असतो. त्यामुळे संस्कृती आणि सुमेधमध्ये सध्या नेमकं काय सुरू आहे याबाबत फॉलोअर्समध्ये कुतूहल निर्माण झालं आहे.

'ही' आहे सिनेसृष्टीतली फ्रेश जोडी!
SHARES

रिअल लाईफमध्ये जशा काही जोड्या अनपेक्षितपणे जुळतात, तशा रील लाईफमध्येही जुळलेल्या पहायला मिळतात. यातील काही जोड्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात आणि पुन: पुन्हा एकत्र येतात. आता लवकरच एक फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही जोडी आहे सुमेध मुदगलकर आणि संस्कृती बालगुडे यांची. 


दोघांमध्ये काय सुरू?

संस्कृती नेहमीच आपल्या इन्स्टाग्राम अकांउंटवर अॅक्टिव असते. मागील काही दिवसांपासून तिच्या इन्स्टापोस्ट आणि स्टोरीजमध्ये सुमेधचा खूप समावेश असतो. त्यामुळे संस्कृती आणि सुमेधमध्ये सध्या नेमकं काय सुरू आहे याबाबत फॉलोअर्समध्ये कुतूहल निर्माण झालं आहे. संस्कृती आणि सुमेधची नुकत्याच एका प्रोजेक्टच्या निमित्ताने मैत्री झाली आहे. दोघंही समवयस्क असल्याने ही मैत्री केवळ प्रोजेक्टपुरती मर्यादित राहिलेली नाही. केवळ संस्कृतीच्याच नव्हे, तर सुमेधच्याही इन्स्टापोस्ट आणि स्टोरीजमध्ये अधूममधून संस्कृतीचा उल्लेख असतो.


रोमॅन्टिक अल्बममध्ये एकत्र

सुमेध आणि संस्कृतीने आतापर्यंत एकत्र सिनेमा केला नसला तरीही दोघांची जोडी शोभून दिसणारी आहे. सळसळत्या उत्साहातली बबली गर्ल संस्कृती आणि तितकाच शांत चॉकलेट बॉय सुमेध यांचं एक क्युट कपल प्रेक्षकांना नक्कीच आकर्षित करू शकतं. लवकरच हे दोघेही एका रोमॅन्टिक म्युझिक अल्बममध्ये एकत्र दिसणार आहेत.


सिझलींग केमिस्ट्री

याबाबत होकार देत संस्कृती म्हणाली की, होय, सुमेध आणि मी नुकताच एक व्हिडीओ अल्बम शूट केला आहे. नयनरम्य लोकेशन्स आणि श्रवणीय संगीत असलेला हा म्युझिक अल्बम लवकरच रसिकांच्या भेटीला येईल असंही संस्कृतीने सांगितलं. फिल्म इंडस्ट्रीतल्या या फ्रेश जोडीची सिझलींग केमिस्ट्री पाहण्याची उत्सुकता नक्कीच दोघांच्याही चाहत्यांना लागली असेल.



हेही वाचा- 

'विठ्ठल'रुपात दर्शन देणार सचित

रिंकूच्या 'कागर'ला व्हेलेंटाइन डेचा मुहूर्त




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा