Advertisement

'विठ्ठल'रुपात दर्शन देणार सचित


'विठ्ठल'रुपात दर्शन देणार सचित
SHARES

देवादिकांवर आधारित भक्तिमय चित्रपटांनी नेहमीच भारतीय प्रेक्षकांवर मोहिनी घालण्यात यश मिळवलं आहे. अशा चित्रपटांच्या माध्यमातून बऱ्याच कलाकारांनी आपल्या चाहत्यांसाठी देवांच रुप धारण केलं आहे. याच वाटेने जात अभिनेता सचित पाटीलही आता महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना विठ्ठलाच्या रुपात दर्शन देणार आहे.


रहस्यावरून पडदा उठला

महाराष्ट्राच्या लाडक्या विठूमाऊलीवर आधारित असलेल्या 'विठ्ठल' सिनेमाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटात विठ्ठलाच्या भूमिकेत कोण दिसणार? याबाबत उत्सुकता वाढली होती. आता या रहस्यावरून पडदा उठला आहे. आजवर मोजक्याच पण काहिषा हटके आशा भूमिका साकारणारा सचित या चित्रपटात विठ्ठलरुपात भेटणार आहे.


पोस्टर लाँच

राजीव रुईया यांची कथा आणि दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर पोस्टर लाँच करण्यात आला. सावळ्या विठ्ठलाचं मनोहारी रूप दाखवणाऱ्या या पोस्टरवर सचित पाटील दिसत असून, सचितचा हा विठ्ठल अवतार प्रेक्षकांना देखील भावतो आहे. आजच्या आधुनिक युगात देव आणि भक्त यांच्यामधील नातं सांगणारा हा सिनेमा १४ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.


'या' कलाकारांचादेखील समावेश

'विठ्ठल'ची पटकथा रवींद्र पाटील यांची असून, संदीप दंतवते यांनी संवादलेखन केलं आहे. या सिनेमात हर्षदा विजय ही नवोदित अभिनेत्रीदेखील असून, अशोक समर्थ, भाग्यश्री मोटे, दीप्ती धोत्रे आणि हितेन तेजवानी या कलाकारांचादेखील यात समावेश आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा