Advertisement

मृण्मयीचा नवा लुक पाहिला का?

मृण्मयीचा हटके लुक असणारा हा फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. यात मृण्मयी शॉर्ट हेअरकटमध्ये दिसत आहे. सोज्वळ, सात्विक भूमिकांसोबतच माॅर्डन भूमिकाही तितक्याच ताकदीनं साकारण्याचं कसब अंगी असलेल्या मृण्मयीचा हा नवा लुक नेमका कशासाठी आहे, हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.

मृण्मयीचा नवा लुक पाहिला का?
SHARES

अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही कार्यरत असलेली अभिनेत्री मृण्मयी देशपांडे जेव्हा एखादा सिनेमा स्वीकारते, तेव्हा त्याबाबत आपोआपच सर्वांना उत्सुकता लागते. मृण्मयी दर वेळी काहीतरी नवीन घेऊन येईल असा ठाम विश्वास त्या मागे असतो. याच कारणामुळं मृण्मयीचा हा नवा लुक चर्चेचा विषय ठरला आहे.


उत्सुकता वाढवणारा

मृण्मयीनं नेहमीच आघाडीच्या कलाकार-दिग्दर्शकांसोबत काम करत आपल्या अभिनयाच्या कक्षा रुंदावण्याचा प्रयत्न केला आहे. नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यमांमध्ये उत्तम अभिनय आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या या गुणी अभिनेत्रीचा आपला एक वेगळा चाहता वर्ग आहे. मृण्मयीचा हा नवा लुक तिच्या चाहत्यांच्या मनातील उत्सुकता वाढवणारा आहे. 


नवी हेअरस्टाईल

मृण्मयीचा हटके लुक असणारा हा फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. यात मृण्मयी शॉर्ट हेअरकटमध्ये दिसत आहे. सोज्वळ, सात्विक भूमिकांसोबतच माॅर्डन भूमिकाही तितक्याच ताकदीनं साकारण्याचं कसब अंगी असलेल्या मृण्मयीचा हा नवा लुक नेमका कशासाठी आहे, हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. असं असलं तरी मृण्मयी मात्र या नव्या हेअरकटमध्ये खूपच आकर्षक दिसत आहे. मृण्मयीनं नेहमीच आपल्या सालस सौंदर्यानं आणि दमदार अभिनयानं प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. त्यामुळं या नव्या हेअरस्टाईलमधून मृण्मयी एका वेगळया भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे का? हे लवकरच समजेल.



हेही वाचा -

'प्रीतम' घडवणार कोकण-केरळचा संगम!

रोहित बनला संगीतकार




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा