Advertisement

'प्रीतम' घडवणार कोकण-केरळचा संगम!


'प्रीतम' घडवणार कोकण-केरळचा संगम!
SHARES

काही सिनेमांमध्ये भिन्न संस्कृतीचा संगम पाहायला मिळतो. कधी मैत्रीच्या रूपात, तर कधी प्रेमकथेच्या स्वरूपात... असाच एक संगम पहायला मिळणार आहे 'प्रीतम' या आगामी मराठी चित्रपटात.


केरळचंही अनोखं नातं

निसर्गाने सौंदर्याची मुक्तहस्तानं उधळण केलेला प्रदेश म्हणजे कोकण. त्यामुळंच बऱ्याच दिग्दर्शकांना कोकणाची निसर्गरम्य भूमी दाखवण्याचा मोह होत असतो. विस्तीर्ण निळेशार समुद्रकिनारे, कौलारू घरं, नारळ-सुपारीच्या बागा, आंब्यांची झाडं, सुंदर-शांत असा आसमंत आणि संस्कृती परंपरेचा विलक्षण ठेवा असणाऱ्या या मनोहारी लोकेशनची भुरळ निर्मात्यांना व दिग्दर्शकांना पडली नसती तर नवल! आगामी 'प्रीतम' या मराठी चित्रपटाची कथा कोकणच्या भूमीत घडणारी असली तरी यात केरळचंही एक अनोखं नातं जोडलं गेलं आहे.


हळवी प्रेमकथा 

या चित्रपटात निसर्गरम्य सौंदर्याच्या पार्श्वभूमीवर एक हळवी प्रेमकथा खुललेली पहायला मिळणार आहे. कोकणसारखाच निसर्गाचा वरदहस्त केरळलासुद्धा लाभला आहे. कोकण आणि केरळचा एक अनोखा संगम या चित्रपटाच्या निमित्तानं जुळून आला आहे. केरळ मधील प्रसिद्ध विझार्ड प्रोडक्शन या चित्रसंस्थेच्या माध्यमातून 'प्रीतम'ची निर्मिती होत असून, मल्याळम दिग्दर्शक सिजो रॉकी या चित्रपटाच्या निमित्तानं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहेत. प्रणव रावराणे, नक्षत्र मेढेकर, उपेंद्र लिमये, शिवराज वाळवेकर, आनंदा कारेकर, अस्मिता खटखटे, आबा वेलणकर, समीर खांडेकर, नयन जाधव,  विश्वजित  पालव, अजित देवळे, कृतिका या कलाकारांच्या या सिनेमात भूमिका आहेत. 


कोकणात चित्रीकरण 

'प्रीतम'च्या लोकेशन व प्रेमकथेविषयी बोलताना दिग्दर्शक सिजो रॉकी म्हणाले की, या चित्रपटाच्या कथेसाठी सर्वांना प्रेमात पाडणाऱ्या लोकेशनची आवश्यकता होती. त्यामुळं आमच्यासमोर कोकणाशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. एक नितांतसुदर आणि मनाला मस्त फील देणारा अनुभव 'प्रीतम'च्या माध्यमातून प्रेक्षकांना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या चित्रपटाची कथा सुजित कुरूप, पटकथा-संवाद गणेश पंडित यांचे असून गीतं गुरु ठाकूरनं लिहिली आहेत. कला दिग्दर्शन संदीप रावडे करीत असून, वेशभूषा चैत्राली डोंगरे करीत आहेत. चिपळूण, कणकवली, कुडाळ या नयनरम्य परिसरात चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे.



हेही वाचा -

राज्यभरात लोकसभा निवडणुकीसाठी ३ लाख शाईच्या बाटल्या

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून संजय निरूपम यांची हकालपट्टी; मिलिंद देवरा अध्यक्षपदी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा