Advertisement

रोहित बनला संगीतकार

ज्येष्ठ दिग्दर्शिक श्रावणी देवधर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'मोगरा फुलला' या सिनेमातील गीतांना रोहितनं संगीत दिल्याची माहिती मिळाली आहे.

रोहित बनला संगीतकार
SHARES

आज गायक रोहित राऊत हे नाव सर्वांना चांगलंच परिचयाचं आहे. 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या स्पर्धेमुळं नावारूपाला आलेल्या रोहितनं अल्पावधीतच स्वत:ला पार्श्वगायकाच्या रूपात यशस्वीपणे सादर केलं आहे. आज त्याच्या आवाजातील गाणी प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालत असताना त्यानं संगीत दिग्दर्शनातही पाऊल ठेवलं आहे.


मोगरा फुलला

'दुनियादारी'सारख्या गाजलेल्या चित्रपटापासून 'का रे दुरावा'सारख्या लोकप्रिय मालिकेच्या टायटल ट्रॅकपर्यंत सर्वच बाबतीत रोहितनं स्वत:ला सिद्ध केलं आहे. आता तो एका नव्या वाटेवर चालू लागला आहे. ज्येष्ठ दिग्दर्शिका श्रावणी देवधर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'मोगरा फुलला' या सिनेमातील गीतांना रोहितनं संगीत दिल्याची माहिती मिळाली आहे. या सिनेमात स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत आहे.


बालवयापासून गायनात 

'मोगरा फुलला'च्या निमित्तानं रोहितनं नव्या क्षेत्रात टाकलेलं हे पाऊल मोगऱ्याइतकंच सुगंधी ठरावं आणि त्याच्या संगीताचा सुगंध सर्वत्र दरवळावा अशीच त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे. बालवयापासून गायनात रमलेल्या रोहितनं केवळ सिनेमे आणि मालिकांची गीतंच गायली नसून, सिंगल्सवरही भर दिला आहे. 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'च्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या पाच स्पर्धकांमध्ये झळकलेल्या रोहितनं मराठी संगीत क्षेत्रात आपलं नाव कमावलं आहे.


१४ जूनला प्रदर्शित 

पार्श्वगायनासोबतच त्यांनं 'संगीत सम्राट' या संगीतावर आधारित असलेल्या शो चं सूत्रसंचालनही केलं आहे.  त्यामुळंच 'मोगरा फुलला'च्या निमित्तानं त्यानं टाकलेलं हे संगीत दिग्दर्शनातील पहिलं पाऊल अतिशय महत्त्वाचं ठरतं.  १४ जूनला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात स्वप्नीलसोबत साई शक्ती आनंद, संदीप पाठक, नीना कुलकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, सुहिता थत्ते, विघ्नेश जोशी, आनंद इंगळे, प्रसाद लिमये, समिधा गुरु, सोनम निशाणदार, दीप्ती भागवत, प्राची जोशी, संयोगिता भावे, विक्रम गायकवाड, हर्षा गुप्ते, सिद्धीरूपा करमरकर, माधुरी भारती, सुप्रीत कदम, अनुराधा राजाध्यक्ष, आदित्य देशमुख आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.हेही वाचा -

पहा, शेवंताच्या दिलखेचक अदांचा जलवा

‘भारत’च्या ट्रेलरला एप्रिलचा मुहूर्तसंबंधित विषय
Advertisement