Advertisement

‘भारत’च्या ट्रेलरला एप्रिलचा मुहूर्त

‘टायगर झिंदा है’ या सिनेमानंतर ‘भारत’मध्ये प्रेक्षकांना पुन्हा एकदा सलमान-कतरीना कैफ ही जोडी एकत्र दिसणार असल्यानंही ही या सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

‘भारत’च्या ट्रेलरला एप्रिलचा मुहूर्त
SHARES

सलमान खानचा ‘भारत’ हा आगामी सिनेमा सुरू होण्यापूर्वीपासूनच चर्चेचा विषय बनला आहे. ‘टायगर झिंदा है’ या सिनेमानंतर ‘भारत’मध्ये प्रेक्षकांना पुन्हा एकदा सलमान-कतरीना कैफ ही जोडी एकत्र दिसणार असल्यानंही ही या सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. त्यामुळंच ‘भारत’च्या ट्रेलरला एप्रिलचा मुहूर्त मिळणं ही सलमानच्या चाहत्यांसोबतच सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे.


लवकरच ट्रेलर रिलीज

‘टायगर झिंदा है’ चित्रपटांची सिरीज बनवणारे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी ‘भारत’चं दिग्दर्शन केल्यानं प्रेक्षकांना पुन्हा एकदा तीच जादू अनुभवायला मिळणार असल्याची खात्री वाटते. नुकतंच या सिनेमाचं चित्रीकरण संपलं असून, सध्या पोस्ट प्रोडक्शनचं काम वेगात सुरू आहे. अशातच अली अब्बास जफर यांनी लवकरात लवकर ‘भारत’चा ट्रेलर रिलीज करण्यात येणार असल्याचे संकेत देत रसिकांची उत्सुकता ताणली आहे.


रिलीज डेट निश्चित

‘भारत’च्या ट्रेलरची खुशखबर जफर यांनी ट्विटरच्या माध्यमातून सलमानच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे. जफर यांनी लिहिलं आहे की, ‘भारत’च्या ट्रेलरची रिलीज डेट निश्चित करण्यात आली आहे. आता पोस्ट प्रोडक्शनचं काम अखेरच्या टप्प्यात पोहोचलं आहे. त्यामुळं एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात ‘भारत’चा ट्रेलर लाँच करण्याची योजना आहे. हा खूपच स्पेशल सिनेमा असल्यानं आम्ही उत्साहितही आहोत आणि नर्व्हसही.


५ जूनला प्रदर्शित

मागील काही वर्षांपासून जवळजवळ दरवर्षीच ईदच्या मुहूर्तावर आपला एखादा मोठा सिनेमा रिलीज करण्याची परंपरा सलमाननं सुरू केली आहे. त्यानुसार हा सिनेमाही त्याच मुहूर्तावर म्हणजेच ५ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘आॅड टू माय फादर’ या कोरियन चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेल्या या सिनेमात सलमान-कतरीनासोबत तब्बू, दिशा पटानी, जॅकी श्राफ, सोनाली कुलकर्णी आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. हा सिनेमा हिंदीसोबतच मल्याळम, तमिळ आणि तेलगू या प्रादेषिक भाषांमध्येही प्रदर्शित केला जाणार आहे.



हेही वाचा -

हसीना पारकरच्या मुंबईतील घराचा होणार लिलाव

मोबाइल अॅपद्वारे प्रवाशांना मिळणार लोकलची माहिती



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा