हसीना पारकरच्या मुंबईतील घराचा होणार लिलाव

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर हिच्या घरावर केंद्रीय यंत्रणेनं सफेमा अंतर्गत टाच आणली होती. त्यानुसार तिच्या घराचा लिलाव करण्यास मंगळवारी केंद्रीय यंत्रणेनं सुरूवात केली.

हसीना पारकरच्या मुंबईतील घराचा होणार लिलाव
SHARES

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर हिच्या घरावर केंद्रीय यंत्रणेनं सफेमा अंतर्गत टाच आणली होती. त्यानुसार तिच्या घराचा लिलाव करण्यास मंगळवारी केंद्रीय यंत्रणेनं सुरूवात केली. या लिलावात नागपाड्यातील गार्डन हॉल येथील राहत्या घराचा समावेश आहे. तस्करी व परदेशी चलन हेराफेरी प्रतिबंधक कायदा(सफेमा) अंतर्गत ही कारवाई करण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं आहे. या लिलावात केवळ २ ते ३ जणच सहभागी झाले आहेत.


मालमत्ता जप्त

२०१४ मध्ये हसीना पारकरचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तिचा धाकटा भाऊ इक्‍बाल कासकर या घरात  राहत होता. तसंच, २०१७ मध्ये खंडणीप्रकरणी ठाणे खंडणीविरोधी पथकानं त्याला तिथूनच अटक केली होती. सफेमा कायद्यांतर्गत तस्करी व गैर कृत्यातून जमा केलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्यात येतो. या कायद्याच्या कलम ६८ (फ) अंतर्गत तस्कर आरोपीच्या नातेवाईकांच्या मालमत्ता जप्त करण्याचीही तरतूद आहे. ही यंत्रणा थेट केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. त्यांना १९९८ मध्ये या मालमत्तेवर टाच आणण्याचे आदेश देण्यात आले होते. पारकरच्या मृत्यूनंतर तिच्या मुलानं या आदेशाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. एप्रिल २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयानं दाऊदच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते.


घराचा लिलाव

दाऊदच्या कुटुंबियांनी दाखल केलेली याचिका यावेळी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली होती. त्यानुसार, या घरावर केंद्रीय यंत्रणेनं टाच आणली. १ एप्रिल रोजी या घराचा लिलाव करण्यात येणार असल्याचं या पूर्वीच केंद्रीय यंत्रणेनं स्पष्ट केलं होतं. या घराच्या लिलावात सहभागी होणाऱ्यांना २८ मार्चपर्यंत नाव नोंदवण्याची अंतिम तारीख देण्यात आली होती. तसंच, लिलावत भाग घेण्यासाठी प्रथम ३० लाख रुपये डिपॅाझीट देणं बंधनकारक होतं. या घराची मूळ किंमत १.६९ कोटी रुपये आहे. या लिलावात फक्त ३ जणांनी सहभाग घेतल्याचं म्हटलं जातं आहे.


सफेमांतर्गत कारवाई

याच परिसरातील रौनक अफरोज हॉटेल, डांबरवाला बिल्डिंग आणि शबनम गेस्ट हाऊसवर अशा दाऊदच्या मालमत्तांवर या पूर्वी सफेमांतर्गत कारवाई करण्यात आली होती. सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्टनं सर्वाधिक म्हणजे ११.५८ कोटी रुपये लावून या मालमत्तांचा ताबा मिळवला होता.हेही वाचा -

रेल्वे स्थानकावर लिंबू पाणी पिताय, तर आधी हे वाचा...

मुंबई इंडियन्सला दिलासा, लसिथ मलिंगा परतणारसंबंधित विषय