मुंबई इंडियन्सला दिलासा, लसिथ मलिंगा परतणार

पुढील दोन सामन्यांसाठी मलिंगा मुंबईच्या संघात दाखल होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि श्रीलंका क्रिकेट मंडळ यांच्यात तसा करार झाल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई इंडियन्सला दिलासा, लसिथ मलिंगा परतणार
SHARES

इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) बाराव्या हंगामाला सुरूवात होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्स संघाचा प्रमुख गोलंदाज लसिथ मलिंगाला मायदेशी परतल्यामुळं मुंबईच्या संघाला मोठा धक्का बसला होता. राष्ट्रीय कर्तव्यासाठी मलिंगाला आयपीएलमधील ६ सामन्यांना मुकावं लागणार होतं. मात्र, पुढील २ सामन्यांसाठी मलिंगा मुंबईच्या संघात दाखल होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि श्रीलंका क्रिकेट मंडळ यांच्यात तसा करार झाल्याची माहिती मिळत आहे.


स्पेशालिस्ट गोलंदाज

आगामी वर्ल्डकप स्पर्धेमुळं श्रीलंकेच्या निवड समितीनं लसिथ मलिंगाला स्थानिक वन डे स्पर्धेत खेळण्यास सांगितलं आहे. गतवर्षी मलिंगा मुंबई इंडियन्सच्या साहाय्यक खेळाडूंच्या चमूत होता, परंतु लिलावात मुंबईने त्याला स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून २ कोटी रुपयांत संघात दाखल करून घेतलं आहे. दरम्यान, स्थानिक वन डे स्पर्धेत मलिंगा गाॅल संघाचे नेतृत्व सांभाळणार असून, ही स्पर्धा ४ ते ११ एप्रिल या कालावधीत होणार आहे. त्यामुळं मलिंगाला आयपीएलच्या पहिल्या ६ सामन्यांना मुकावं लागणार होतं.


२ सामने खेळण्याची परवानगी

मात्र, बीसीसीआयनं केलेल्या मध्यस्थीनंतर मलिंगाला २ सामने खेळण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळं २८ मार्च रोजी होणाऱ्या रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू आणि ३० मार्च रोजी होणाऱ्या किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यांसाठी मलिंगा उपस्थित राहणार आहे. यासाठी बीसीसीआयनं मलिंगाबाबतचा निर्णय घेण्यासाठी श्रीलंका क्रिकेट मंडळाला ३ दिवसांची मुदत दिली आहे.हेही वाचा -

हिमालय पूल दुर्घटनेनंतर मुंबईतील पुलांचे ऑडिट पुन्हा देसाईकडे

मोबाइल अॅपद्वारे प्रवाशांना मिळाणार लोकलची माहितीसंबंधित विषय