पहा, शेवंताच्या दिलखेचक अदांचा जलवा

शेवंताच्या अदांवर आज केवळ महाराष्ट्रच नव्हे तर परदेशातील मराठी प्रेक्षकही फिदा आहेत. अण्णांसमोर हट्ट करणारी, प्रेमळ वाद करणारी शेवंता जर तुमच्यासमोर अवकाशातून अवतरली आणि तुमच्यासाठी खास जर तिनं एक छान नृत्य सादर केलं तर?

  • पहा, शेवंताच्या दिलखेचक अदांचा जलवा
  • पहा, शेवंताच्या दिलखेचक अदांचा जलवा
SHARE

झी मराठी वाहिनीवरील 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेचा उल्लेख होताच आज सर्वप्रथम आठवते ती शेवंता... आपल्या मादक अभिनयानं अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकरच्या दिलखेचक अदा आता प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत.


अनपेक्षित पाऊल

'रात्रीस खेळ चाले' मालिकेमध्ये जेव्हापासून शेवंताची एंट्री झाली, तेव्हापासून मालिकेची लोकप्रियता खूप वाढली आहे. या मालिकेत शेवंता बनलेल्या अपूर्वा नेमळेकरला पाहता पाहता प्रेक्षकांनी उचलून धरलं आहे. त्यामुळंच प्रेक्षकांनाही शेवंता आता नेमकं काय करणार याची उत्सुकता लागलेली असते. अशातच शेवंतानं एक अनपेक्षित पाऊल उचलत चक्क पुरस्कार सोहळ्यामध्ये आपल्या अदांचा जलवा दाखवला आहे.


मनमोहक नृत्य 

शेवंताच्या अदांवर आज केवळ महाराष्ट्रच नव्हे तर परदेशातील मराठी प्रेक्षकही फिदा आहेत. अण्णांसमोर हट्ट करणारी, प्रेमळ वाद करणारी शेवंता जर तुमच्यासमोर अवकाशातून अवतरली आणि तुमच्यासाठी खास जर तिनं एक छान नृत्य सादर केलं तर? शेवंता तिच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी खरंच एक मनमोहक नृत्य सादर करणार आहे. तिची दिलखेचक अदा प्रेक्षकांना 'झी चित्र गौरव २०१९' या पुरस्कार सोहळ्यात पहायला मिळणार आहे. 


पुरस्कारांचं २० वं वर्ष

झी गौरव पुरस्कारांचं यंदाचं हे २० वं वर्ष आहे. त्यामुळं या सोहळ्याला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. यामध्ये शेवंता ९० दशकातील गाजलेल्या गाण्यांवर नृत्य करणार आहे. तिचा हा धमाकेदार परफॉर्मन्स पाहून चाहते मात्र एकच कल्ला करतील यात शंका नाही. 'झी चित्र गौरव २०१९' पुरस्कार सोहळ्याचं प्रसारण ३१ मार्च रोजी केलं जाणार आहे.हेही वाचा -

ज्येष्ठ व्हायोलिनवादक प्रभाकर जोग यांना 'जीवन गौरव'
संबंधित विषय
ताज्या बातम्या