Advertisement

ज्येष्ठ व्हायोलिनवादक प्रभाकर जोग यांना 'जीवन गौरव'

मूळातच व्हायोलिन हे वाद्य म्हणजे तरल, हळवे सूर. या वाद्याचा गोडवा आणि हळवेपणा तंतोतंत यांच्या व्यक्तिमत्वात उतरलं असल्याची जाणीव होते आणि हे गाणारं व्हायोलिन म्हणजे प्रभाकर जोग असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

ज्येष्ठ व्हायोलिनवादक प्रभाकर जोग यांना 'जीवन गौरव'
SHARES

मराठी रसिकांइतकीच मराठी चित्रपटसृष्टीही ज्याची आतुरतेनं वाट पाहते तो झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यंदाचं झी गौरव पुरस्कार सोहळ्याचं २० वं वर्ष आहे. नेहमीच दिमाखदारपणे आणि भव्य दिव्य स्वरूपात पार पडणारा हा सोहळा सर्वांनाच खुणावत असतो. मागील वीस वर्षांमध्ये या पुरस्कार सोहळ्यानं अनेक दिग्गज कलाकार-तंत्रज्ञांना सन्मानित केलं आहे. यंदा ज्येष्ठ व्हायोलिनवादक प्रभाकर जोग यांना जीवन गौरव देऊन सन्मानित करण्यात आलं

 

पं. गजाननबुवांकडे श्रीगणेशा

मूळातच व्हायोलिन हे वाद्य म्हणजे तरल, हळवे सूर. या वाद्याचा गोडवा आणि हळवेपणा तंतोतंत यांच्या व्यक्तिमत्वात उतरलं असल्याची जाणीव होते आणि हे गाणारं व्हायोलिन म्हणजे प्रभाकर जोग असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. नगरमधल्या हरेगाव जिल्ह्यात १६ जणांच्या कुटुंबात जन्म झालेल्या प्रभाकरजींच्या वडिलांना असलेली संगीत नाटकांची विशेष आवड कदाचित त्यांच्यात झिरपली असावी. पं. गजाननबुवांकडे त्यांनी संगीताचा श्रीगणेशा केला आणि नंतर नारायणबुवा मारुलकरांकडे आपले शिक्षण सुरु राहिलं. 


प्रसारण ३१ मार्च रोजी

यादरम्यान प्रभाकर जोग यांना व्हायोलिन सतत खुणावत राहिलं. त्या काळात तब्बल २५० रुपयांचं लहानसं व्हायोलिन प्रभाकरजींना मिळालं. तिथून या वाद्यासोबत त्यांची जी गट्टी जमली, ती अगदी आजवर. अनेक अडचणींचा सामना करत त्यांच्या या प्रवासात प्रभाकरजींनी संगीतसाधनेत मात्र खंड पडू दिला नाही. संगीत क्षेत्रात व्हायोलिन म्हणजे जोग हेच समीकरण बनलं. संगीतावर प्रेम करणाऱ्या तमाम रसिकांच्या वतीनं प्रभाकर जोग यांना यंदाचा झी चित्र गौरव २०१९ चा जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी जोग यांना त्यांच्या राहत्या घरी जाऊन हा मानाचा पुरस्कार प्रदान केला. या पुरस्कार सोहळ्याचं प्रसारण ३१ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता होणार आहे.



हेही वाचा -  

पाण्यासाठी तरुणाईचा लढा!

'बिग बॅास'ची वरात, फिल्मसिटीच्या दारात!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा