'बिग बॅास'ची वरात, फिल्मसिटीच्या दारात!

मराठी 'बिग बॅास'च्या पहिल्या पर्वाचं चित्रीकरण लोणावळयात करण्यात आलं होतं, पण दुसऱ्या पर्वात हा मुक्काम हलवण्यात आल्याचं समजतं. दुसऱ्या पर्वात बरेच महत्त्वाचे बदलही करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

  • 'बिग बॅास'ची वरात, फिल्मसिटीच्या दारात!
SHARE

हिंदी 'बिग बॅास'च्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या मराठी 'बिग बॅास'च्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचा अफलातून प्रतिसाद लाभला होता. मेघा धाडे पहिल्या पर्वाची विजेती बनल्यानंतर सर्वांनाच मराठी 'बिग बॅास'च्या दुसऱ्या पर्वाचे वेध लागले आहेत. आता याची तयारीही सुरू झाली असून, दुसऱ्या पर्वामध्ये मराठी 'बिग बॅास'चा मुक्काम फिल्मसिटीमध्ये असणार अशी माहिती मिळाली आहे.


प्रेक्षकांची पसंती

'बिग बॅास'चा आपला एक वेगळा प्रेक्षक वर्ग आहे. नेहमीपेक्षा वेगळं मनोरंजन असल्यानं आणि सेलिब्रिटीजच्या आयुष्यात डोकावण्याची संधी मिळत असल्यानं या शो ला अपार लोकप्रियता लाभली आहे. याच कारणामुळं हिंदीत सुरू असलेला हा शो प्रादेशिक भाषांमध्येही सुरू करण्यात आला. हिंदीत सलमान खान, तर मराठीत त्याचा जीवलग मित्र असलेल्या महेश मांजरेकर यांना घेऊन मराठी 'बिग बॅास'चा खेळ सुरू करण्यात आला. ज्याच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती लाभली.


दुसरे पर्व

वाद-विवाद, प्रेम प्रकरणं, भांडणं, हेवेदावे हा 'बिग बॅास'चा मूळ गाभा असून, यातूनच फुलत गेलेली मैत्री आणि त्या माध्यमातून वास्तवात उलगडले जाणारे मैत्रीचे विविध पदर हे देखील या शोचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळंच या शोनं आपल्या फॅन्सचं एक वेगळं पॅाकेट तयार केलं आहे. या प्रेक्षकांसाठी मराठी 'बिग बॅास'चं दुसरं पर्व येणार ही खुशखबर आहे. यासाठी मराठी 'बिग बॅास'ची टिम सध्या जोरदार तयारी करत आहे.


बिग बॉस फिल्मसिटीत

मराठी 'बिग बॅास'च्या पहिल्या पर्वाचं चित्रीकरण लोणावळयात करण्यात आलं होतं. पण दुसऱ्या पर्वात हा मुक्काम हलवण्यात आल्याचं समजतं. दुसऱ्या पर्वात बरेच महत्त्वाचे बदलही करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार मुख्य बदल म्हणजे मराठी 'बिग बॅास'चा लोणावळ्यातील मुक्काम गोरेगाव फिल्मसिटी म्हणजेच दादासाहेब फाळके चित्रनगरीत हलवण्यात येणार आहे. यासाठी लवकरच फिल्मसिटीमध्ये भव्य दिव्य सेट उभारण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून समजतं. या मागील नेमकं कारण काय ते अद्याप समजू शकलं नसलं तरी या निर्णयामुळं सर्वांचाच प्रवासाचा वेळ वाचणार हे मात्र नक्की.हेही वाचा -

... तर पॅार्नस्टार बनली असती कंगना?

'ग्रहण' फेम योगेश देशपांडे दिग्दर्शनाच्या वाटेवरसंबंधित विषय
ताज्या बातम्या