Advertisement

पाण्यासाठी तरुणाईचा लढा!

आजच्या काळात ऋतू कोणताही असो पाण्याची कमतरता ही कायमच जाणवते. अशा या अतिशय गंभीर विषयावर आधारित 'H2O कहाणी थेंबाची' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

पाण्यासाठी तरुणाईचा लढा!
SHARES

एकाच विषयावर लवकरच तीन सिनेमे पाहायला मिळणार असल्याचं आम्ही काही दिवसांपूर्वीच एका बातमीद्वारे सांगितलं होतं. उन्हाळा वाढत असताना सगळीकडं पाणी टंचाई जाणवत आहे. याच पाण्यावर आधारित असलेले लवकरच तीन सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. यापैकी 'H2O कहाणी थेंबाची' या सिनेमात तरुणाईचा पाण्यासाठी लढा पहायला मिळणार आहे.


पोस्टर प्रदर्शित

उन्हाळ्याचे चटके आता जाणवू लागले आहेत. या उन्हासोबतच एक मोठी समस्या अनेक ठिकाणी भेडसावते. ती म्हणजे पाण्याचं दुर्भिक्ष. आजच्या काळात ऋतू कोणताही असो पाण्याची कमतरता ही कायमच जाणवते. अशा या अतिशय गंभीर विषयावर आधारित 'H2O कहाणी थेंबाची' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे. 


एक खंबीर निर्धार

भेगा गेलेल्या जमिनीतून दोन तरुण मुलांचे आक्रमक चेहरे आणि मागील बाजूस एकत्रित आलेली तरुणाई या पोस्टरमध्ये पाहायला मिळते. मनाशी एक खंबीर निर्धार करून तो पूर्णत्वास नेण्याचा त्यांचा ध्यास चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. या पोस्टरमधील तडा गेलेल्या जमिनीवर मोजकेच पाण्याचे थेंब दिसत आहेत. हे मोजकेच थेंबही तरुणाईला प्रोत्साहन देणारे आहे. म्हणूनच चित्रपटाच्या टॅगलाइन मध्ये 'कहाणी थेंबाची' असं म्हटलं आहे. 


सकारात्मक संदेश

चित्रपटाचं दिग्दर्शन मिलिंद पाटील यांनी केलं आहे. तिसरं महायुद्ध पाण्यावरूनच होईल, असे म्हटलं जातं. आपल्याला जर भविष्यातील भीषण स्थिती थांबावायची असेल, तर आतापासूनच प्रयत्न करावे लागतील. असा काहीसा सकारात्मक संदेश देणारा हा चित्रपट जी. एस. प्रोडक्शन निर्मित असून, १२ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. पाण्याच्या एका थेंबाचं महत्व सांगणाऱ्या या चित्रपटात अशोक. एन. डी., सुप्रित निकम, धनंजय धुमाळ, शीतल अहिरराव, किरण पाटील हे कलाकार दिसणार आहेत.



हेही वाचा -

Movie Review : लढवय्या शीखांच्या वीरगाथेचं 'केसरी' प्रतिबिंब

पहा, आमिर-किरणचा मराठमोळा अंदाज!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा