Advertisement

‘शकिला’साठी पंकज शिकतोय मल्याळम

पंकज आता मल्याळम अॅडल्ट फिल्मस्टार आणि डान्सर शकिला खानवर आधारित असलेल्या ‘शकिला’ या सिनेमात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. पंकज लवकरच या सिनेमाचं शूटिंग सुरू करणार आहे.

‘शकिला’साठी पंकज शिकतोय मल्याळम
SHARES

पंकज त्रिपाठी हे आज हिंदी सिनेसृष्टीतील एक मोठं नाव बनलं आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता हा कलाकार नेहमीच काही ना काही वेगळं करण्याच्या धडपडीत किंवा आपल्या भूमिकेला उचीत न्याय देण्यासाठी कोणत्याही प्रकारचं परीश्रम घेत असतो. सध्या पंकज मल्याळम भाषेचे धडे गिरवत असल्याचं समजतं.


रजनीकांतसोबत स्क्रीन शेअर

‘काला’ या तमीळ सिनेमात रजनीकांत यांच्यासोबत स्क्रीन शेअर केल्यानंतर पंकज आता मल्याळम अॅडल्ट फिल्मस्टार आणि डान्सर शकिला खानवर आधारित असलेल्या ‘शकिला’ या सिनेमात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. पंकज लवकरच या सिनेमाचं शूटिंग सुरू करणार आहे. या सिनेमातील पंकजचं कॅरेक्टर शकिलाच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावणारं असल्याने अतिशय महत्त्वाचं मानलं जात आहे.


भूमिकेला न्याय देण्यासाठी

या सिनेमातील आपली व्यक्तिरेखा तकलादू वाटू नये यासाठी पंकज मल्याळम भाषेच्या उच्चारांवर काम करत आहे. आपली भूमिका आणि त्यातील संवाद फेक वाटू नयेत यासाठी मल्याळम शिकण्याचं ठरवल्याचं पंकजचं म्हणणं आहे. मल्याळम भाषा शिकल्याने ‘शकिला’मधील आपल्या भूमिकेला योग्य न्याय देणं सोपं होईल असंही पंकज मानतो. आपल्या मादक अदांनी दक्षिणात्य सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या शकिला खानचं इंडस्ट्रीत ब्रेक मिळण्यापूर्वीचं आणि लाइमलाईटमध्ये आल्यानंतरचं जीवन या सिनेमात दाखवण्यात येणार आहे.हेही वाचा -

EXCLUSIVE : निखिल राऊत अाता शिवाजी महाराजांच्या भूमिकेत

'काहे दिया परदेस' फेम शुभांगी जोशी यांचं निधन
संबंधित विषय
POLL

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसे-भाजप यांची युती होईल, असं वाटतं का?
Submitting, please wait ...
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा