Advertisement

अभिनेता रजत बेदीच्या कारच्या धडकेत जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू

अभिनेता रजत बेदीच्या अडचणी वाढल्या असून त्याला अटक होण्याची शक्यता आहे.

अभिनेता रजत बेदीच्या कारच्या धडकेत जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू
SHARES

बॉलिवूड अभिनेता रजत बेदीच्या (Rajat Bedi) गाडीनं एका व्यक्तीला धडक दिल्याची घटना सोमवारी घडली होती. या अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीचा मंगळवारी कूपर रुग्णालयात (Cooper Hospital) उपचारावेळी मृत्यू झाला आहे. राजेश धूत असं मृत्य व्यक्तीचे नाव आहे. यामुळे अभिनेता रजत बेदीच्या अडचणी वाढल्या असून त्याला अटक होण्याची शक्यता आहे.

अभिनेता रजत बेदी सोमवारी संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास अंधेरी येथील डी.एन नगर परिसरातून गाडीनं जात होता. त्यावेळी त्याच्या गाडीसमोर राजेश धूत आला आणि हा अपघात झाला. या अपघातामध्ये राजेश धूत गंभीर जखमी झाला होता.

रजत बेदीनं प्रसंगावधान राखत जखमी राजेशला तातडीनं कूपर रुग्णालयात दाखल केलं. तिथं त्याच्यावर उपचार सुरू होते. रजत बेदीनं कबूल केलं होतं की, तो माणूस त्याच्या कारनेच जखमी झाला होता.

पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच या प्रकरणी रजत बेदीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीएन नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आता अपघातामधील जखमी व्यक्तीचा मृत्यू झाल्यानं रजत बेदीला अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रजत बेदीनं पोलिसांना सांगितलं आहे की, जखमी झालेली व्यक्ती नशेत होती आणि चुकून त्याच्या कारसमोर आली. तो काम करुन घरी परतत होता आणि रस्ता ओलांडताना अपघाताचा बळी ठरला. कारनं धडक दिल्यानंतर त्याच्या डोक्याला कंबरेला दुखापत झाली होती. रजतनं त्याच्या उपचारांचा संपूर्ण खर्च उचलण्याचं आश्वासन दिलं होतं.

रजत बेदीने मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली. त्यानं आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात १९८८ साली '२००१' या हिंदी चित्रपटापासून केली. या चित्रपटात जॅकी श्रॉफ, डिंपल कपाडिया आणि तब्बू मुख्य भूमिकेत होते.

रजत बेदी यांनी अभिनेता म्हणून नव्हे तर खलनायक म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत छाप पाडली आहे. ज्याचे प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी देखील खूप कौतुक केलं. याशिवाय, रजत 'कोई मिल गया', 'इंटरनॅशनल खिलाडी' सारख्या चित्रपटांचाही भाग राहिला आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून तो चित्रपटांपासून दूर आहे. रजत बेदी सध्या परदेशात आपला व्यवसाय करत आहे.



हेही वाचा

थिएटरसोबतच अमेझॉन, नेटफ्लिक्सवर रिलीज होणार कंगनाचा थलायवी, ५५ कोटीत करार

अखेर 'सेलमोन भोई' गेमवर बंदी; न्यायालयाचा सलमान खानला दिलासा

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा