Advertisement

थिएटरसोबतच अमेझॉन, नेटफ्लिक्सवर रिलीज होणार कंगनाचा थलायवी, ५५ कोटीत करार

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा आगामी चित्रपट थलायवी या दिवशी प्रदर्शित होणार.

थिएटरसोबतच अमेझॉन, नेटफ्लिक्सवर रिलीज होणार कंगनाचा थलायवी, ५५ कोटीत करार
SHARES

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) आगामी चित्रपट थलायवी (Thalaivi) १० सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कंगना दिवंगत अभिनेत्री आणि मुख्यमंत्री जे जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट चित्रपटगृहांसोबतच दोन ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) प्रदर्शित होणार असल्याचं वृत्त आहे.

हा चित्रपट नेटफ्लिक्स (Netflix) आणि अमेझॉन प्राइमवर (Amazon Prime) रिलीज होणार आहे. दोन ओटीटी प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी चित्रपट प्रदर्शित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. वृत्तानुसार, या चित्रपटाचे अधिकार ५५ कोटी रुपयांना विकले गेले आहेत.

अलीकडेच, एक व्हिडिओ रिलीज करत कंगनानं थिएटर मालकांना चित्रपटाला अधिक विंडो देण्याचं आवाहन केलं होतं. यासह तिनं सांगितलं होतं की, तिच्या चित्रपटासाठी अनेक मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोठ्या ऑफर्स मिळत आहेत. मात्र नफ्याकडे दुर्लक्ष करत निर्मात्यांनी चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

लेखक श्रीधर पिल्लई यांनी अलीकडेच ट्विट करून सांगितलं होतं की, 'थलायवी लवकरच देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. खरं तर चित्रपटाला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यासाठी रेकॉर्ड रेट्सच्या ऑफर मिळाल्या होत्या. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाचे स्ट्रीमिंग नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत तर प्राइम व्हिडिओवर तामिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये केले जाईल. थलायवी लवकरच चित्रपटगृहात,' अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं होतं.

ए. एल विजय दिग्दर्शित या चित्रपटात कंगनासह अरविंद स्वामी, नासर, भाग्यश्री, राज अर्जुन आणि मधु बाला यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

२०२० पासून पुढे ढकलण्यात आलेला हा चित्रपट यावर्षी २३ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र चित्रपटगृह बंद झाल्यानंतर पुन्हा त्याचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं होतं. आता अखेरीस १० सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.



हेही वाचा

कंगनाचं ट्विटर अकाऊंट कायमचं सस्पेंड

अखेर 'सेलमोन भोई' गेमवर बंदी; न्यायालयाचा सलमान खानला दिलासा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा