Advertisement

'पद्मावत' बघायला या! रणवीरचं चाहत्यांना आवतन!!

बहुतेक प्रेक्षक इच्छा असूनही पद्मावत सिनेमा बघण्यासाठी थिएटरमध्ये जाण्यास कचरत आहेत. अशा चाहत्यांना उद्देशून या सिनेमात अल्लाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारणारा अभिनेता रणवीर सिंगने इन्स्टाग्रामवर एक संदेश लिहिला आहे.

'पद्मावत' बघायला या! रणवीरचं चाहत्यांना आवतन!!
SHARES

डिसेंबर महिन्यापासून वादात अडकेलेला 'पद्मावत' सिनेमा अडथळ्यांची शर्यत पार करत अखेर शुक्रवारी २५ जानेवारीला रिलीज झाला. मात्र सिनेमा रिलीज होऊनही देशभर निदर्शने सुरूच आहेत. त्यामुळे बहुतेक प्रेक्षक इच्छा असूनही सिनेमा बघण्यासाठी थिएटरमध्ये जाण्यास कचरत आहेत. अशा चाहत्यांना उद्देशून या सिनेमात अल्लाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारणारा अभिनेता रणवीर सिंगने इन्स्टाग्रामवर एक संदेश लिहिला आहे. या संदेशात तो पद्मावतच्या टीमला धन्यवाद देण्यासोबत चाहत्यांना सिनेमा बघण्यासाठी आमंत्रण देत आहे.


रणवीरचा संदेश काय?

रणवीर म्हणतो, 'काल रात्री मी ३ डी आयमॅक्समध्ये 'पद्मावत' पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर मी खूप भारावून गेलो. मी स्वत:ला नशीबवान समजत आहे. प्रेक्षकांनी माझ्या कामाची खूप प्रशंसा केली. त्यांच्या प्रतिक्रीया ऐकून मी प्रचंड आनंदी आणि समाधानी आहे. संजय सरांचे मनापासून आभार. ही भूमिका मला देऊन त्यांनी एक अद्वितीय भेट दिली आहे. 'पद्मावत' च्या टीमची मेहनत पडद्यावर दिसते. सिनेमाच्या रिलीजच्या दिवशी मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. सोबतच माझा सिनेमा बघण्यासाठी निमंत्रणही देत आहे. संपूर्ण देशाला या सिनेमाचा गर्व वाटेल.

रणवीरच्या या संदेशावर चाहत्यांनी देखील भरभरून प्रतिक्रीया दिल्या आहेत. अनेकांनी तर त्याला 'किंग ऑफ बॉलिवूड' संबोधलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा