Advertisement

संतोष जुवेकर गिरवतोय जर्मन भाषेचे धडे

संतोष सध्या आपल्या पहिल्या वहिल्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टच्या तयारीत व्यग्र आहे. याच महिन्यात संतोष एका जर्मन फिल्ममध्ये काम करणार आहे. संतोष सध्या या चित्रपटाच्या वर्कशॉप्समध्ये घाम गाळत आहे. संतोषची महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या या जर्मन चित्रपटाचं शीर्षक 'डिसोनन्स' असं आहे.

संतोष जुवेकर गिरवतोय जर्मन भाषेचे धडे
SHARES

अभिनेता संतोष जुवेकरनं बऱ्याचदा साकारलेल्या रावडी टाईपच्या भूमिका प्रेक्षकांना खूप भावल्या आहेत. काही वेळा एखाद्या सोज्वळ, प्रेमळ नायकाच्या भूमिकेतही दिसलेला संतोष आता एका जर्मन चित्रपटासाठी आर्मी ऑफिसर बनला आहे. यासाठी तो जर्मन भाषा शिकत आहे.


जर्मन फिल्ममध्ये काम

संतोष सध्या आपल्या पहिल्या वहिल्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टच्या तयारीत व्यग्र आहे. याच महिन्यात संतोष एका जर्मन फिल्ममध्ये काम करणार आहे. संतोष सध्या या चित्रपटाच्या वर्कशॉप्समध्ये घाम गाळत आहे. संतोषची महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या या जर्मन चित्रपटाचं शीर्षक 'डिसोनन्स' असं आहे. हा एक सायन्स फिक्शन चित्रपट आहे. यात पिटर नावाच्या आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत संतोष दिसणार आहे. या सिनेमाच्या सेटवरील संतोषचे काही खास फोटो 'मुंबई लाइव्ह'ला मिळाले आहेत.


फिटनेस मेन्टेन 

या भूमिकेसाठी संतोषनं मागील काही महिने आपल्या फिटनेसवर प्रचंड मेहनत घेतली असून सध्या त्यावरच लक्ष केंद्रित केलं आहे. योग्य आहार आणि जिम ट्रेनिंगव्दारे त्यानं आर्मी ऑफिसरसारखा फिटनेस मेन्टेन केला आहे. त्याचप्रमाणं आर्मी ऑफिसर्सच्या फिझीकल अपिअरन्स आणि वागण्या-बोलण्याच्या पध्दतींचाही बारकाईनं अभ्यास केला आहे. सध्या एका जर्मन शिक्षकाकडून तो जर्मन भाषेचं प्रशिक्षण घेत आहे.


थर्ड डिग्री ट्रेनिंग

आपल्या पहिल्या जर्मन चित्रपटाबाबत संतोष म्हणाला की, सैन्यात जवानांना शारीरिक मेहनतीसोबतच मानसिक शिक्षणही दिलं जातं. त्यांच्या मेन्टल फिटनेसची परीक्षा घेताना त्यांच्यासोबत अनेक माइंड गेम्सही खेळले जातात. त्यांना मानसिकदृष्ट्याही सक्षम करण्यासाठी मेन्टली थर्ड डिग्री ट्रेनिंग देण्यात येतं. यावरच हा सिनेमा आधारित आहे. पिटर या जर्मन आर्मी अधिकाऱ्याच्या भूमिकेत मी साजेसा वाटावा यासाठी मी सर्वतोपरी तयारी केली आहे.


कसून मेहनत

'डिसोनन्स'बाबत संतोष म्हणाला की, 'डिसोनन्स'च्या फिल्ममेकर्सना हा चित्रपट काही दिवसांमध्ये सुरू होणाऱ्या एका जर्मन फिल्म फेस्टिव्हलमध्ये पाठवायचा आहे. सिनेमाचा विषय खूप वेगळा आहे. अशा विषयावरचं एखादं आंतराष्ट्रीय प्रोजेक्ट करायला मिळावं, अशी प्रत्येक अभिनेत्याची इच्छा असते. म्हणूनच सिनेमाला योग्य न्याय देण्यासाठी मी भूमिकेवर कसून मेहनत करतो आहे. जर्मन भाषा हा यातला सर्वात कठीण भाग आहे. जर्मन भाषा आणि त्याचे उच्चार अस्खलित व्हावेत यासाठी मी सध्या ट्युटरकडून ट्रेनिंग घेत आहे.



हेही वाचा - 

पानिपतच्या लढाईनंतरचं सत्य सांगणार 'बलोच'!

प्रसिद्ध चंदन थिएटर दुरुस्तीसाठी बंद, ३ वर्षांनंतर होणार सुरू




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा