Advertisement

प्रसिद्ध चंदन थिएटर दुरुस्तीसाठी बंद, ३ वर्षांनंतर होणार सुरू

मुंबईतल्या जुहू परिसरातील प्रसिद्ध चंदन थिएटर दुरुस्तीसाठी बंद करण्यात आलं आहे. या थिएटरमध्ये अक्षय कुमारचा 'केसरी' हा अखेरचा सिनेमा दाखवण्यात आला होता. दुरुस्तीनंतर हे थिएटर ३ वर्षांनंतर पुन्हा सुरू करण्यात येईल.

प्रसिद्ध चंदन थिएटर दुरुस्तीसाठी बंद, ३ वर्षांनंतर होणार सुरू
SHARES

मुंबईतल्या जुहू परिसरातील प्रसिद्ध  चंदन थिएटर दुरुस्तीसाठी बंद करण्यात आलं आहे. या थिएटरमध्ये अक्षय कुमारचा 'केसरी' हा अखेरचा सिनेमा दाखवण्यात आला होता. दुरुस्तीनंतर हे थिएटर ३ वर्षांनंतर पुन्हा सुरू करण्यात येईल, अशी माहिती थिएटरचे मालक समीर जोशी यांनी दिली.


प्रसिद्ध थिएटर

बॉलिवुडमधील अमिताभ बच्चन, अक्षयकुमार, धर्मेंद्र, यासारख्या स्टार मंडळींच्या या भागातील असलेल्या वास्तव्यामुळं तसंच त्यांच्या उपस्थितीमुळं या थिएटरला ग्लॅमर प्राप्त झालं होतं. त्यामुळं जुहू भागातील सिने रसिकांच्या दृष्टीने या थिएटरला विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं.


१९७४ साली बांधकाम

चंदन थिएटरचं बांधकाम १९७४ साली करण्यात आलं होतंं. तेव्हापासून असंख्य हाऊसफूल या थिएटरने दिले आहेत. प्रसिद्धदिग्दर्शक राज कपूर यांच्या हस्ते या थिएटरचं उद्घाटन करण्यात आलं होतं. 'बॉबी' हा सिनेमा या थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला पहिला सिनेमा होता.



हेही वाचा -

भटक्या कुत्र्यांनतर मांजरांची होणार नसबंदी



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा