Advertisement

सुशांत सिंग राजपूत दरोडा टाकण्यासाठी तयार


सुशांत सिंग राजपूत दरोडा टाकण्यासाठी तयार
SHARES

‘ब्योमकेश बक्शी’, ‘एम. एस. धोनी’ आणि ‘राबता’ या एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमांत आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूत लवकरच डाकूच्या वेशात दिसणार आहे.  


अंतराळवीर आणि डाकूच्या मागचं गुपीत?

खरंतर सुशांत चंदा मामा दूर के या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांसमोर येतोय. या चित्रपटातील त्याच्या एका लूकची सध्या जोरदार चर्चा आहे. त्याचा एक फोटो सोशलमिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. या चित्रपटात सुशांत एका अंतराळवीराची भूमिका साकारत आहे.

मात्र आपण जर फोटो बघीतला तर त्यात सुशांत डाकूच्या वेशात दिसेल. जर सुशांत चंदा मामा दूर के या चित्रपटात अंतराळवीराची भूमिका साकारत आहे, तर तो डाकूच्या वेशात कसा? असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. मात्र सुशांतचा हा फोटो चंदा मामा दूर के मधला नसून त्याच्या आणखी एक चित्रपटाचा तो फर्स्ट लूक आहे.



तरण आदर्शने हा फोटो त्याच्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना सुशांत एका वेगळ्या प्रवासासाठी सज्ज झाला आहे, असं कॅप्शन दिलं आहे. अभिषेक चौबे दिग्दर्शित 'सोनचिरैया' या चित्रपटाचा हा फर्स्ट लूक आहे. सुशांतनेही हा फोटो सोशलमीडियावर शेअर केला आहे. या फोटोत सुशांतने कपाळावर टीळा लावला असून खाकी गणवेश घातला आहे. त्याच्या एका बाजूला बंदूक आहे.


चाहत्यांसाठी डबल ट्रीट

अजून सुशांतच्या चंदा मामा दुर के या सिनेमाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आलेला नाही. त्या आधीच सुशांतचा सोनचिरैया या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रद्रशित झाला आहे. त्यामुळे २०१८ साली सुशांतकडून चाहत्यांना डबल ट्रीट मिळणार आहे. हे वर्ष सुशांत आणि त्याच्या चाहत्यांसाठी खास असणार हे मात्र नक्की.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा