स्वप्नीलच्या राघवचा पाळण्यातच अभिनय सुरू

काहीजण बालपणीच आपले कलागुण दाखवत भविष्यात कोणत्या दिशेने वाटचाल करणार त्याचे संकेत देतात. अभिनेता स्वप्नील जोशीचा मुलगा राघवने वडिलांच्या एक पाऊल पुढे टाकत पाळण्यात असल्यापासूनच अभिनय करायला सुरुवात केली आहे.

  • स्वप्नीलच्या राघवचा पाळण्यातच अभिनय सुरू
  • स्वप्नीलच्या राघवचा पाळण्यातच अभिनय सुरू
  • स्वप्नीलच्या राघवचा पाळण्यातच अभिनय सुरू
SHARE

‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात...’, अशी म्हण आपल्याकडे प्रचलीत आहे. त्यानुसार काहीजण बालपणीच आपले कलागुण दाखवत भविष्यात कोणत्या दिशेने वाटचाल करणार त्याचे संकेत देतात. अभिनेता स्वप्नील जोशीचा मुलगा राघवने वडिलांच्या एक पाऊल पुढे टाकत पाळण्यात असल्यापासूनच अभिनय करायला सुरुवात केली आहे.

Raaghav 4.jpeg

नवव्या महिन्यातच कॅमेरा फेस

मराठीसह हिंदीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा स्वप्नील जोशी मागील २५ वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. स्वप्नीलने वयाच्या नवव्या वर्षीच अभिनयात पदार्पण केलं, पण ‘बाप से बेटा सवाई...’ म्हणतात ते खोटं नाही. राघव स्वप्नीलपेक्षा सवाई ठरला असून, अवघ्या नवव्या महिन्यातच त्याने कॅमेरा फेस केला आहे.

Raaghav 3.jpeg

जाहीरातीद्वारे राघव प्रेक्षकांसमोर

न्यू जॉन्सनच्या नुकत्याच लाँच झालेल्या जाहीरातीद्वारे राघव प्रेक्षकांसमोर आला आहे. नवव्या महिन्यातच राघवने जाहीरातविश्वात एंट्री मारली आहे. गत वर्षी ७ डिसेंबरला स्वप्नीलच्या घरी राघवचं आगमन झालं आणि वर्षभराच्या आतच तो टीव्हीवर झळकलाही. स्वप्नीलच्या चाहत्यांसाठी ही खूप मोठी बातमी आहे.

Raaghav 2.jpeg


हेही वाचा -

अशोक सराफांच्या उपस्थितीत ‘हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमाचा ट्रेलर लाँच!

संबंधित विषय
ताज्या बातम्या