Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
55,601
3,028
Maharashtra
6,39,075
62,194

स्वप्नील जोशी करणार आयपीएलच्या अंतिम सामन्याचं समालोचन!

क्रिकेटच्या मराठमोळ्या चाहत्यांसाठी यंदाचा आयपीएल हंगाम एका वेगळ्याच गोष्टीसाठी खास ठरणार आहे. कारण, पहिल्यांदाच क्रिकेट सामन्याचे समालोचन मराठीतून होणार आहे. येत्या २७ मे रोजी होणाऱ्या 'व्हिवो आयपीएल'च्या अंतिम सामन्यात हे समालोचन ऐकण्याची संधी मिळणार आहे.

स्वप्नील जोशी करणार आयपीएलच्या अंतिम सामन्याचं समालोचन!
SHARES

सध्या देशात आयपीएल २०१८ चे वारे जोमाने वाहत आहे, आयपीएलच्या यंदाच्या पर्वात कोणता संघ बाजी मारणार याची उत्सुकता भारतातील प्रत्येक क्रीडा चाहत्यांना लागून राहिली आहे. मात्र, क्रिकेटच्या मराठमोळ्या चाहत्यांसाठी यंदाचा आयपीएल हंगाम एका वेगळ्याच गोष्टीसाठी खास ठरणार आहे. कारण, पहिल्यांदाच क्रिकेट सामन्याची कॉमेंट्री म्हणजेच समालोचन मराठीतून होणार आहे. येत्या २७ मे रोजी होणाऱ्या 'व्हिवो आयपीएल'च्या अंतिम सामन्यात हे समालोचन ऐकण्याची संधी मिळणार आहे.


स्वप्नील जोशीचा सहभाग

'VIVO IPL' च्या अंतिम सामन्याच्या या खास कार्यक्रमात मराठीचा सुपरस्टार स्वप्नील जोशी सहभागी होणार आहे.


स्वप्नील म्हणतो...

मराठी भाषा आणि क्रिकेट या दोन्हीबद्दल प्रत्येक मराठी माणसाच्या मनात विशेष स्थान आहे. आयपीएल २०१८ च्या अंतिम सामन्याच्या निमित्ताने या दोन्ही गोष्टी एकत्र येणार असल्यानं त्याचा भाग होण्यासाठी मी प्रचंड उत्सुक असल्याचं स्वप्नील जोशी सांगतो.

२७ मे रोजी होणाऱ्या या अंतिम सामन्यापूर्वी सहा वाजल्यापासून खास कार्यक्रम सुरू होणार आहे. त्यानंतर मराठी समालोचनासह अंतिम सामन्याचा आनंद घेता येणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा