Advertisement

अमिताभ, शाहरुखनंतर आता थेट वरुण


अमिताभ, शाहरुखनंतर आता थेट वरुण
SHARES

वरुण धवनने 'स्टुडंट अॉफ द इयर' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. 'स्टुडंट अॉफ द इयर'च्या यशानंतर वरुणने अनेक हीट सिनेमे दिले आणि याचीच दखल हाँगकाँगच्या मादाम तुसा म्युझियमने घेतली आहे. आता महानायक अमिताभ बच्चन आणि किंग खान शाहरुख यांच्यापाठोपाठ अभिनेता वरुण धवनचा मेणाचा पुतळा मादाम तुसा म्युझियममध्ये उभा राहणार आहे.

सध्या वरुण त्याचा आगामी सिनेमा 'सुई धागा'च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. यात तो अनुष्का शर्मा सोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. त्याचप्रामणे शुजित सरकारच्या हटके कथा असणाऱ्या 'अक्टुबर' या चित्रपाटचं शुटींग नुकतेच वरुणने पूर्ण केलं आहे. त्यानंतर वरूण 'किक २' मध्ये सलमानसोबत दिसणार आहे.


गेल्या वर्षी सलमान खानचा 'ट्युबलाईट' आणि शाहरूख खानचा 'हॅरी मेट सेजल' हे दोन्ही सिनेमे स्पर्धेत असताना वरुण धवनच्या 'बद्रीनाथ की दुल्हनिया' आणि 'जुडवा २' हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर गाजले होते. 'बद्रीनाथ की दुल्हनिया'ने १०० कोटीहून अधिक कमाई केली होती, तर 'जुडवा २' ने २०० कोटींचा आकडा पार केला होता.

या मेणाच्या पुतळ्याचं अनावण करण्यासाठी वरुण धवन आपल्या वडिलांबरोबर गेला होता. यावेळी वरुणने आपल्या जुडवा वरुण बरोबर फोटोही काढले. यावेळेचे फोटो आणि व्हिडिओ वरुणने चाहत्यांबोरबर शेअर केला आहे. याआधी मादाम तुसा म्युझियममध्ये अमिताभ बच्चन, ऐश्वर्या रॉय बच्चन, सलमान खान, शाहरूख खान यांचे मेणाचे पुतळे आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा