Advertisement

‘फुलराणी’ बनली ‘फुलपाखरू’!


‘फुलराणी’ बनली ‘फुलपाखरू’!
SHARES

नाटक, सिनेमा आणि मालिका अशा सर्वच माध्यमांमध्ये आपला ठसा उमटवणारी अाणि ‘फुलराणी’ म्हणून अापली वेगळी अोळख निर्माण करणारी अभिनेत्री हेमांगी कवी अाता छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ‘फुलपाखरू’ या झी युवा वाहिनीवरील लोकप्रिय मालिकेत ती एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.


यूथफुल कंटेंट

युथफूल कंटेंट देणारी ‘फुलपाखरू’ ही मालिका विविध कारणांमुळे चर्चेत आहे. अवघ्या वर्षभरातच या मालिकेनं आपला वेगळा चाहतावर्ग निर्माण केला अाहे. या मालिकेतील वैदेही म्हणजेच अभिनेत्री ऋता दुर्गुळे आणि मानस म्हणजेच यशोमन आपटे तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले अाहेत.


योग टीचरच्या भूमिकेत

कॉलेजच्या अल्लड वयात जुळलेलं प्रेम, त्यांचा एकमेकांवरचा लटका राग, त्यांची खोडकर मस्ती, थोडे रुसवे-फुगवे असं प्रेम करणाऱ्या मानस आणि वैदेहीची प्रेमकथा ‘फुलपाखरू’ या मालिकेत पाहायला मिळत आहे. बरेच ट्विस्ट्स अँड टर्न्स असणाऱ्या या मालिकेत आता एक नवा पण ओळखीचा चेहरा पाहायला मिळणार आहे. हेमांगी कवी या मालिकेत योग टीचर बनून एंट्री करणार आहे.


माझ्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात छोट्या पडद्यापासून झाली. त्यामुळे मी या माध्यमात काम करण्यासाठी नेहमीच उत्साही असते. ‘फुलपाखरू’ची संपूर्ण टीम खूप एनर्जेटिक असल्यामुळे काम करताना खूप मजा येते. प्रेक्षकांनी नेहमीच माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला असून यापुढेही माझ्या कामावर असंच प्रेम करतील, याची खात्री आहे.
- हेमांगी कवी, अभिनेत्री


हेही वाचा -

Exclusive: अशा राजकारण्यांना धरून बडवायला हवं- शरद पोंक्षे

धक्कादायक! अभिनेत्री सोनाली बेंद्रेची कॅन्सर झुंज



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा