Advertisement

म्हणून मी हिरो, कंगनाचा ठाकरे सरकारला टोला

बाॅलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या जुहू येथील कार्यालयावर मुंबई महापालिकेने (bmc) केलेली कारवाई ही सूडबुद्धीने केल्याचं सांगत मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला मोठा दणका दिला.

म्हणून मी हिरो, कंगनाचा ठाकरे सरकारला टोला
SHARES

बाॅलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या जुहू येथील कार्यालयावर मुंबई महापालिकेने (bmc) केलेली कारवाई ही सूडबुद्धीने केल्याचं सांगत मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला मोठा दणका दिला. शिवाय कंगनाला महापालिकेकडून पाठवण्यात आलेली नोटीस देखील रद्द केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना तुम्ही व्हिलन झालात म्हणूनच मी हिरो ठरले, असा टोला तिने सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.

मुंबई महापालिकेने कंगना रणौतच्या कार्यालावर केलेली कारवाई ही अत्यंत घाईने, वाईट हेतूने आणि सूडबुद्धीनं केल्याचं स्पष्ट दिसत आहे. कायद्याचं पालन न करता वैयक्तिक द्वेषापोटी ही कारवाई करण्यात आल्याने ती बेकायदा आहे. एखाद्या नागरिकाने बेजबाबदार वक्तव्ये करून कितीही मूर्खपणा केला तरी सरकार आणि प्रशासनाने त्याकडं दुर्लक्ष करणंच सोईस्कर असतं. ती वक्तव्ये कितीही त्रासदायक असली तरीही प्रशासन कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन आणि कुहेतूने कारवाई करू शकत नाही, असं महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. शाहरुख काथावाला व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाने नोंदवलं. 

हेही वाचा- कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई बेकायदा, उच्च न्यायालयाचा बीएमसीला दणका

कंगनाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “जेव्हा एखादी व्यक्ती सरकारविरोधात उभी राहते आणि विजय मिळवते तेव्हा हा त्याचा एकट्याचा नाही तर लोकशाहीचा विजय असतो. मला हिंमत देणाऱ्या सर्वांचे आभार आणि माझ्या तुटलेल्या स्वप्नांवर हसणाऱ्यांचेही आभार. कारण तुम्ही व्हिलन झालात म्हणूनच मी हिरो ठरले”.

कंगना विरूद्ध शिवसेना (shiv sena) असा सामना रंगलेला असताना महापालिकेने कंगनाच्या जुहू येथील कार्यालयातील बांधकाम अनधिकृत असल्याचं सांगत पाडलं होतं. त्यानंतर कंगनाने महापालिकेविरोधात २ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा दावा केला. त्यावर न्यायालयाने नुकसान झालेल्या मालमत्तेचं मूल्यांकन करण्यासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. तसंच यापुढे कारवाई करण्यापूर्वी महापालिकेने ७ दिवसांची नोटीस द्यावी, असे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. 

कंगना कार्यालयाचा ताबा घेऊ शकते, असं स्पष्ट करताना सरकारविरोधात मत व्यक्त करत असताना संयम बाळगण्याचा सल्ला देखील न्यायालयाने कंगनाला दिला आहे.

(actress kangana ranaut reaction over bombay high court judgement on office demolition case against bmc)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement