Advertisement

कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई बेकायदा, उच्च न्यायालयाचा बीएमसीला दणका

कंगना रणौत हिच्या जुहू येथील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली होती. याविरोधात कंगनाने उच्च न्यालालयात धाव घेतली होती.

कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई बेकायदा, उच्च न्यायालयाचा बीएमसीला दणका
SHARES

अभिनेत्री कंगना रणौत हिचे कार्यालय तोडण्याची मुंबई महापालिकेची कारवाई मुंबई उच्च न्यायालयानं अवैध ठरवली आहे.  महापालिकेकडून करण्यात आलेली कारवाई ही अत्यंत घाईने आणि वाईट हेतूने, सूडबुद्धीने केल्याचं स्पष्ट दिसत आहे, अशा शब्दात न्यायालयाने मुंबई महापालिकेला फटकारलं आहे.  हे कार्यालय महापालिकेला पूर्ववत करून द्यावे लागेल, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.

कंगना रणौत हिच्या जुहू येथील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली होती. याविरोधात कंगनाने उच्च न्यालालयात धाव घेतली होती. कंगनाने महापालिकेविरोधात नुकसानभरपाईचा दावा ठोकला. महापालिकेच्या बेकायदा कारवाईमुळे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे म्हणत कंगनाने तेवढ्या रकमेच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. 

याप्रकरणी शुक्रवारी न्यायमूर्ती शाहरुख काथावाला व न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. उच्च न्यायालयानं पालिकेची ही कारवाई अवैध ठरवली आहे. महापालिकेने बजावलेली नोटीस आणि त्यानंतर तोडकामाचा काढलेला आदेश दोन्ही न्यायालयाने रद्द केला आहे.

कारवाईमुळे काय नुकसान झाले याचे मूल्यांकन करण्यासाठी न्यायालयाने अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.  भरपाईची रक्कम ठरवण्यासाठी व्हॅल्यूअरला तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर भरपाईविषयी मार्चमध्ये योग्य तो आदेश दिला जाईल, असं खंडपीठानं स्पष्ट केलं.



हेही वाचा-

कंगनाला हायकोर्टाकडून दिलासा, ८ जानेवारीपर्यंत अटक टळली

Mumbai Metro मेट्रोसाठी आणखी १२ गाड्या; एकूण संख्या ९६ वर

चोरापासून तरुणीला वाचवलं मग स्वत:च लुटलं; लोकलमधील धक्कादायक प्रकार



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा