Advertisement

mumbai metro मेट्रोसाठी आणखी १२ गाड्या; एकूण संख्या ९६ वर

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे आणखी १२ मेट्रो गाड्यांची ऑर्डर देण्यात आली आहे.

mumbai metro मेट्रोसाठी आणखी १२ गाड्या; एकूण संख्या ९६ वर
SHARES

मेट्रो २ए (दहिसर-डीएन नगर) आणि मेट्रो ७ (दहिसर पूर्व-अंधेरी पूर्व) हे दोन्ही प्रकल्प नव्या वर्षात मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत. त्यापूर्वी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे आणखी १२ मेट्रो गाड्यांची ऑर्डर देण्यात आली आहे. त्यामुळं एकूण मेट्रो गाड्यांची संख्या ९६ वर पोहोचली आहे.

पुढील वर्षी मकरसंक्रातीच्या मुहूर्तावर १४ जानेवारीला मेट्रो २ ए आणि मेट्रो ७ या दोन्ही मार्गांवर चाचणी सुरू करण्याची ग्वाही अलीकडेच एमएमआरडीए आयुक्त आर. ए. राजीव यांनी दिली होती. या पार्श्वभूमीवर डिसेंबरमध्ये मेट्रो गाड्या मुंबईत येणं अपेक्षित आहे. त्यानुसार लवकरच गाड्यांचा पहिल्या सेट बेंगळुरूच्या भारत अर्थ मूव्हरेस लिमिटेड कंपनीच्या उत्पादन कक्षातून चारकोप डेपोकडं मार्गस्थ होणार आहे.

या गाड्या वजनाने हलक्या, ऊर्जाबचत करणाऱ्या तसेच वातानुकूलित असतील. या गाड्या ड्रायव्हरलेस टेक्नोलॉजीयुक्त असून, प्रवाशांची भीती दूर होईपर्यत चालक तैनात होणार असल्याची माहिती मिळते. अतिरिक्त गाड्या मेट्रो २ बी (डीएन नगर-मानखुर्द), मेट्रो ७ए आणि मेट्रो ९ (अंधेरी ते छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि दहिसर ते मीरा भाईंदर) या मार्गांसाठी मागवण्यात आल्या आहेत. यासाठी ५०१ कोटी रुपयांचा निधी निश्चित करण्यात आला आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा